Independence Day 2023: पाकिस्तान १५ ऑगस्टलाच साजरा करायचा स्वातंत्र्यदिन; मग का बदलली गेली तारीख? जाणून घ्या कारण

Pakistan Independence Day 2023: पाकिस्तानचा स्वातंत्र्यदिन १४ ऑगस्ट रोजी का साजरा केला जातो. जाणून घ्या कारण.
pakistan independence day
pakistan independence day saam tv
Published On

Why Pakistan Celebrates Independence Day on 14th August:

भारतात दरवर्षी १५ ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा केला जातो. तर भारताच्या शेजारील राष्ट्रात म्हणजे पाकिस्तानात १४ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिन साजरा केला जातो. या दोन्ही देशांना एकाच दिवशी स्वातंत्र्य मिळालं होतं. १५० वर्ष इंग्रजांनी राज्य केल्यानंतर दोन्ही देशांना एकाच दिवशी स्वातंत्र्य मिळालं होतं.

खुप कमी लोकांना माहीत असेल की, भारताप्रमाणेच पाकिस्तानचा स्वातंत्र्यदिन देखील १५ ऑगस्ट रोजीच साजरा केला जायचा. मात्र असं काय घडलं ज्यामुळे पाकिस्तानचा स्वातंत्र्यदिन १४ ऑगस्ट रोजी साजरा केला जाऊ लागला. जाणून घ्या यामागचं कारण.

pakistan independence day
IND vs WI 5th T20I Records: कॅप्टन म्हणून कर्णधार पंड्या सपशेल फेल!दारूण पराभव होताच झाली 'या' लाजिरवाण्या विक्रमांची नोंद

मोहम्मद अली जिन्ना यांनी केलं होतं संबोधित..

स्वातंत्र्य पाकिस्तानला पहिल्यांदा संबोधित करण्याचा मान मोहम्मद अली जिन्ना यांना मिळाला होता. त्यांनी १५ ऑगस्ट रोजी पाकिस्तानातील देशवासियांचे आभार मानले होते. माध्यमातील वृत्तानूसार पाकिस्तान १४ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिन साजरा करण्यामागे २ कारणे आहेत.

फाळणी झाल्यानंतर सुरूवातीचे २ स्वातंत्र्यदिन १५ ऑगस्टलाच केले साजरा..

भारत पाकिस्तानची फाळणी झाल्यानंतर पाकिस्तानने सुरूवातीचे २ स्वातंत्र्यदिन १५

ऑगस्ट रोजी साजरा केले होते. मोहम्मद अली जिन्ना यांचा मृत्यू झाल्यानंतर स्वातंत्र्यदिन १४ ऑगस्ट रोजी साजरा केला जाऊ लागला. (Latest news in marathi)

pakistan independence day
Independence Day 2023: दहशतवादाच्या संशयातून Kolhapur हिटलिस्टवर? NIA चा तीन ठिकाणी छापा, तिघांना घेतलं ताब्यात (पाहा व्हिडिओ)

१४ ऑगस्ट १९४७ रोजी रमजानचा २७ वा दिवस..

पाकिस्तानला वेगळं राष्ट्र म्हणून १४ ऑगस्ट रोजीच मान्यता मिळाली होती. तर १४ ऑगस्ट १९४७ रोजी रमजानचा २७ वा दिवस होता. इस्लामिक मान्यतेनूसार याच रात्री पवित्र ग्रंथ कुराण अवतरला होता. इस्लामिक कालनिर्णय पाहिलं तर, हा दिवस अतिशय पवित्र मानला जातो. हेच कारण आहे की, पाकिस्तानने या दिवसाला स्वातंत्र्यदिन म्हणून मान्यता दिली. १४ ऑगस्ट १९४७ रोजी ब्रिटीश व्हाईसरॉय लॉर्ड माउंटबॅटन यांनी पाकिस्तानला स्वतंत्र देश म्हणून घोषित केले होते, असा तर्कही दिला जातो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com