IND vs WI 5th T20I Records: कॅप्टन म्हणून कर्णधार पंड्या सपशेल फेल!दारूण पराभव होताच झाली 'या' लाजिरवाण्या विक्रमांची नोंद

Hardik Pandya Captaincy Record: या पराभवासह भारतीय संघाच्या नावे लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झाली आहे.
Team india
Team indiasaam tv
Published On

Records Made In IND vs WI 5th T20I: भारतीय संघाला ५ टी -२० सामन्यांच्या मालिकेत ३-२ ने पराभवाचा सामना करावा लागला आहे. फ्लोरिडामध्ये भारत विरुद्ध वेस्टइंडीज यांच्यातील टी -२० मालिकेतील अंतिम सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघाला ८ गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला आहे.

भारतीय संघाने वेस्टइंडीज संघासमोर विजयासाठी १६६ धावांचे आव्हान ठेवले होते. या धावांचा पाठलाग करताना वेस्टइंडीज संघाने ८ गडी राखून हे आव्हान पूर्ण केले. या पराभवासह भारतीय संघाच्या नावे लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झाली आहे.

Team india
IND vs WI 5th T20i Highlights: वर्ल्डकपलाही पात्र न ठरलेल्या विंडीजकडून टीम इंडियाचा पराभव; ३-२ ने गमावली टी-२० मालिका

हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली गमावली पहिलीच मालिका..

रोहित शर्माच्या अनुपस्थितीत भारतीय संघाची जबाबदारी हार्दिक पंड्याकडे सोपवण्यात आली होती. मात्र तो भारतीय संघाला मालिका जिंकून देऊ शकला नाही. भारतीय संघाने ही मालिका ३-२ ने गमावली. यासह हार्दिक पंड्या एकाच टी -२० मालिकेत ३ सामने गमावणारा पहिलाच भारतीय कर्णधार ठरला आहे.

सलग १५ मालिका जिंकल्यानंतर पहिलाच पराभव..

वेस्टइंडीज संघाविरुद्ध सलग १५ मालिका जिंकल्यानंतर भारतीय संघाने पहिल्यांदाच मालिका गमावली आहे. वेस्टइंडीजने २०१६ मध्ये भारतीय संघाला पराभूत केलं होतं. त्यानंतर भारतीय संघाने एकही मालिका गमावली नव्हती. (Latest sports updates)

Team india
IND vs WI 5th T20i Highlights: वर्ल्डकपलाही पात्र न ठरलेल्या विंडीजकडून टीम इंडियाचा पराभव; ३-२ ने गमावली टी-२० मालिका

पहिल्यांदाच गमावले ३ सामने..

भारतीय संघाचा टी -२० क्रिकेटमधील रेकॉर्ड दमदार आहे. मात्र पहिल्यांदाच भारतीय संघाने एकाच टी -२० मालिकेत ३ सामने गमावले आहेत.

या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाकडून सूर्यकुमार यादवने सर्वाधिक ६१ धावांची खेळी केली होती. या खेळीच्या जोरावर भारतीय संघाने २० षटक अखेर १६५ धावांचा डोंगर उभारला होता. या धावांचा पाठलाग करताना वेस्टइंडीज संघाकडून ब्रेंडन किंगने सर्वाधिक ८५ धावांची खेळी केली आणि वेस्टइंडीज संघाला सामना आणि मालिका देखील जिंकून दिली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com