Ratan Tata's Birthday  Saam Tv
देश विदेश

Ratan Tata: जिद्दीचे नाव रतन टाटा! 'उपकार करतोय' म्हणत फोर्डच्या मालकाने केला अपमान, 9 वर्षांनी टाटांनी घेतला सणसणीत बदला

असामान्य, आदर्श व्यक्तीमत्व घडताना त्यांनी केलेला संघर्ष, आणि सहन केलेला अपमान त्यांना पेटून उठायला कारणीभूत असतात असे म्हणले जाते. उद्योजक रतन टाटांचाही फोर्ड कंपनीच्या मालकाने असाच अपमान केला होता

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Ratan Tata: आपल्या असामान्य कर्तुत्वाने आणि इच्छाशक्तीने जगभरातील उद्योजक विश्वात प्रेरणास्त्रोत्र ठरणाऱ्या रतन टाटांचा आज वाढदिवस. देशातील एक महान, आदर्श उद्योजक म्हणून रतन टाटा यांचे नाव घेतले जाते. आज (28, डिसेंबर) रतन टाटा यांचा वाढदिवस..

असामान्य, आदर्श व्यक्तीमत्व घडताना त्यांनी केलेला संघर्ष, आणि सहन केलेला अपमान त्यांना पेटून उठायला कारणीभूत असतात असे म्हणले जाते. उद्योजक रतन टाटांचाही फोर्ड कंपनीच्या मालकाने असाच अपमान केला होता, ज्याचा त्यांनी ९ वर्षांनी सणसणीत बदला घेतला. काय होता हा किस्सा चला जाणून घेवू.

हा किस्सा आहे १९९०मधील. यावेळी रतन टाटा टाटा उद्योग समूहाचे चेअरमन होते. टाटाने यावेळी त्यांची इंडिका कार नुकतीच लॉंन्च केली होती. मात्र त्यावेळी त्यांच्या अपेक्षेप्रमाणे टाटाच्या गाड्यांची विक्री झाली नाही, आणि त्यामुळे कंपनीला मोठे नुकसान होऊ लागले. त्यामुळेच रतन टाटांनी त्यांच्या पॅसेंजर कार्सचा उद्योग विकण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी अमेरिकेतील फोर्ड कार्स कंपनीशी संपर्कही केला. ( Tata Group)

ज्यावेळी ते यासंबंधीत फोर्स कंपनीशी चर्चेसाठी गेले त्यावेळी फोर्डचे मालक बिल फोर्डने त्यांना अत्यंत अपमानास्पद वागणूक दिली. "तुम्हाला माहिती नसताना तुम्ही कार बनवण्याचा निर्णय घेतलाच कसा? मी तुझी कंपनी विकत घेवून तुझ्यावर उपकार करतोय," अशा शब्दात त्यांनी टाटांचा अपमान केला. (Ratan Tata)

अपमान टाटांच्या जिव्हारी लागला-फोर्ड कंपनीच्या मालकाने केलेला अपमान टाटांच्या चांगलाच जिव्हारी लागला होता. मात्र त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया न देता त्याच रात्री ते मुंबईला निघून आले. याबद्दल त्यांनी कोणाशी चर्चाही केली नाही ते आपल्या कामात व्यस्त झाले. त्यांनी फक्त आपल्या उद्योगावर लक्ष केंद्रित करत प्रगती करण्याचा निश्चय केला. याचेच फलित म्हणजे २००८ मध्ये त्यांची टाटा कंपनी जगभरात लोकप्रिय झाली. त्यांच्या गाड्यांना जगभरातून मोठी मागणी येवू लागली.

एकीकडे टाटा कंपनीची भरभराट होत असताना फोर्ड कंपनीचे मात्र दिवाळ निघाले होते. बिल फोर्ड यांच्या फोर्ड कंपनीला मोठा तोटा सहन करावा लागला होता. यावेळी नऊ वर्षापूर्वी ज्यांचा अपमान केला होता. त्याच टाटांनी त्यांना लॅंड रोवर आणि जग्वार कंपनी विकत घेण्याची ऑफर दिली. इतकेच नव्हेतर स्वतः अमेरिकेतून बिल फोर्ड रतन टाटांच्या भेटीला भारतात आले.

नऊ वर्षापुर्वी ज्यांनी अपमान केला त्या बिल फोर्डंचा सूर आता मात्र नरमला होता. यावेळी त्यांनी "तुम्ही आमची कंपनी विकत घेत आमच्यावर मोठे उपकार करत आहात," असे म्हणत टाटांचे आभार मानले. ९ वर्षापुर्वी टाटांचा अपमान करणाऱ्या फोर्डच्या मालकांना मुंबईत येवून आभार मानावे लागले, हाच टाटांच्या जिद्दीचा आणि संघर्षाचा दाखला होता.

दरम्यान, यावेळी खरेदी केलेल्या लॅंड रोवर आणि जग्वार कंपन्या जगभरात आलिशान गाड्यांच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lucky Zodiac Signs: 11 नोव्हेंबरपासून 'या' राशींचं नशीब चमकणार; शतांक योगाने नुसता पैसाच नाही तर करियरमध्येही मिळणार संधी

Weekly Horoscope: 'या' राशींच्या व्यक्तींना व्यवसायात नवीन संधी उपलब्ध होतील; वाचा साप्ताहिक राशीभविष्य

हेलिकॉप्टर बैज्या आणि ब्रेकफेल बैलजोडी ठरली फार्च्युनरची मानकरी; पुढच्या शर्यतीसाठी महागड्या कारची घोषणा

Politics : राष्ट्रवादी काँग्रेसला होम ग्राऊंडवर मोठा धक्का; कट्टर तटकरे समर्थकांसह शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

महायुतीत मिठाचा खडा? तानाजी सावंतांची राष्ट्रवादीवर जहरी टीका, अजित पवारांच्या नेत्याकडूनही जोरदार पलटवार

SCROLL FOR NEXT