Hantavirus Saam Tv
देश विदेश

Hantavirus : कोरोनापेक्षाही भयंकर! उंदरापासून पसरणाऱ्या विषाणूमुळे खळबळ, ३ जणांचा मृत्यू; १२ देशांना अलर्ट

Hantavirus Infection: जगाला आणखी एका महामारीचा धोका असल्याचे सांगण्यात आले आहे. जागतिक आरोग्य संस्थेने हंताव्हायरसबाबत सतर्कतेचा इशारा दिला आहे. यामुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे.

Siddhi Hande

जगाचे टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने आता हंता व्हायरसला गंभीर संसर्गजन्य रोज म्हणून जाहीर केले आहे. क्रूझ शिपवर झालेल्या हंता व्हायरसच्या संसर्गानंतर चिंता वर्तवली जात आहे. हा व्हायरस खूप गंभीर असल्याचे म्हटले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या महामारी विभागाच्या संचालक मारिया व्हॅन केरखोव्ह यांनी याबाबत माहिती दिली आहे. हा विषाणू कोविड १९ नाहीये. परंतु तरीही हा गंभीर आहे. हा विषाणू अनेक वर्षांपासून अस्तित्वात आहे.

ओशनवाइड एक्सपीडिशन्स कंपनीच्या एमव्ही होडिंयस कंपनीच्या जहाजावरील लोकांना या व्हायरसचा धोका निर्माण झाला आहे. क्रूझ शिपवरील लोकांना हंता व्हायरल झाला होता. यामध्ये पहिला मृत्यू ११ एप्रिल रोजी झाला. ७० वर्षीय डच नागरिकाचा मृत्यू झाला. त्यानंतर दोन आठवड्यांनी हा मृतदेह सेंट हेलेना येथे उतरवण्यात आला. तेव्हा त्याला हंता व्हायरस झाल्याचे निदान झाले. त्यांची पत्नी विमानाने दक्षिण आफ्रिकेला गेल्या होत्या. त्यांना विमानतळावर त्रास झाल्याने रुग्णालयात दाखल केले. त्यांचाही २६ एप्रिल रोजी मृत्यू झाला.

हंता व्हायरल हा उंदरांद्वारे मानवांमध्ये पसरते. संक्रमित उंदरांचे मूत्र, लाळ किंवा विष्ठेतील काही कण हवेत मिसळतात. श्वास घेताना ते शरीरात शिरतात. त्यानंतर हा व्हायरल होतो हा कोणताही नवीन विषाणू नाहीये. मात्र, याची तीव्रता जास्त आहे. या व्हायरससाठी १२ देशांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

कॅनडा, डेन्मार्क, जर्मनी, नेदरलँड्स, न्यूझीलंड, सेंट किट्स आणि नेव्हिस, सिंगापूर, स्वीडन, स्वित्झर्लंड, तुर्की, ब्रिटन आणि अमेरिका या देशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आले आहेत. ज्या देशांमधील लोक या जहाजावर होते त्यांना खबरदारी घेण्यास सांगितले आहे.

लक्षणे

हंताव्हायरसची लक्षण सामान्य फ्लूसारखी आहे. सुरुवातीला ताप, थकवा, सांधेदुखी होते. यानंतर संसर्ग वाढल्यास परिस्थिती गंभीर होते. श्वास घेण्यास त्रास, फुस्फुसात पाणी, मूत्रपिंडाच्या समस्या निर्माण होऊ शकतात. काहींना फुफ्फुसातून रक्सस्त्राव होण्याची शक्यतादेखील असते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: हातनुर धरणाचे ८ दरवाजे उघडले, तापी नदीमध्ये १७,०२२ क्युसेक

Mulshi Waterfall : ५ ते १० मिनिटांच्या ट्रेकनंतर दिसतो 'हा' धबधबा, मुळशीजवळ लपलंय सुंदर ठिकाण

Famous Actor : शूटिंगदरम्यान प्रसिद्ध अभिनेत्याला चावला विषारी किडा; रुग्णालयात उपचार सुरू, प्रकृती गंभीर

Pune Traffic Change: पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! आज शहरातील प्रमुख रस्ते राहणार बंद, पर्यायी मार्ग कोणते?

Rain Alert : आजही मुसळधार पाऊस! पुण्यासह घाटमाथ्याला ऑरेंज अलर्ट; मुंबईत पावसाची काय स्थिती? वाचा हवामानाचा अंदाज

SCROLL FOR NEXT