नवी दिल्ली : इराण आणि इस्त्रायलमध्ये रक्तरंजित संघर्ष सुरुच असल्याचं पाहायला मिळत आहे. इराण आणि इस्त्रायलमध्ये मागील ९ महिन्यांपासून युद्ध सुरु आहे. आज बुधवारी हमामचा प्रमुख इस्माइन हानियाची हत्या करण्यात आली आहे. हमासच्या प्रमुखाची इराणची राजधानी तेहरानमध्ये त्याची हत्या करण्यात आली आहे. इराणच्या सरकारी माध्यमांनी याविषयी माहिती दिली आहे. मात्र, इस्त्रायलने या हल्ल्याची कोणतही जबाबदारी घेतली नाही. तसेच त्यांच्याकडून अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही.
इस्त्रायलने ७ ऑक्टोबरचा बदला घेत हमासच्या प्रमुखाची हत्या करण्यात आल्याचं बोललं जात आहे. हमासने स्वत: इरानची राजधानी तेहरानमध्ये हमासचे प्रमुख इस्माइल हानियाची हत्या झाल्याची माहिती दिली. तेहरान येथील त्यांच्यावर घरावरच हल्ला करण्यात आला. हमासच्या प्रमुखासह त्याच्या एका सुरक्षारक्षकाचीही मृत्यू झाला आहे. तेहरानमधील हा हल्ला बुधवारी पहाटे करण्यात आला.
हल्लाच्या एक दिवस आधी मंगळवारी इस्माइल हानिया हे इराणचे नवे राष्ट्राध्यक्षांच्या शपथविधी सोहळ्यास सामील झाले होते. यावेळी इराणमधील नेते अयातुल्ला अली खामेनेई यांची हानिया यांनी भेट घेतली होती.
इस्त्रायलच्या सुरक्षादलाने काही महिन्यांपूर्वी हानिया यांच्या तीन मुलांचीही हत्या केली होती. इस्त्रायलने गाझा पट्टी एअरस्ट्राइक कर हानियाच्या तीन मुलांची हत्या करण्यात आली होती. इस्त्रायली सेन्य आयडीएफने सांगितले की, हानियाचे मुले आमिर, हाजेम आणि मोहम्मद हे गाझा पट्टीत दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देत होते. यादरम्यान, त्यांच्यावर हवाई हल्ला करत त्यांची हत्या करण्यात आली.
इस्त्रायल आणि हमासदरम्यान ७ ऑक्टोबर २०२३ पासून युद्धाला सुरुवात झाली. हमासने इस्त्रायलवर हल्ला केला. त्यावेळी १२०० जणांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच हमासने २५० जणांना ओलीस देखील ठेवलं होतं. त्यातील १५० जण अद्याप त्यांच्या ताब्यात असल्याचाही दावा करण्यात येत आहे. इस्त्रायली हल्ल्यात आतापर्यंत ३९ हजारांहून अधिक फिलिस्तीनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. इस्त्रायलचं म्हणणं आहे की, युद्धात हमास आणि संबंधित १४ हजारांहून लोकांना मारण्यात आलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.