Morbi Cable Bridge Collapses : गुजरातमध्ये (Gujarat) रविवारी सायंकाळी एक मोठी दुर्घटना घडली. मोरबी येथे मच्छू नदीवरील सुमारे १०० वर्षे जुना झुलता पूल कोसळ्याने जवळपास ४०० जण नदीत पडले. या दुर्घटनेत आतापर्यंत १४० जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले. मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. या अपघातात भाजप खासदार मोहन कुंडारिया यांच्या कुटुंबातील १२ जणांना जीव गमवावा लागला.
कुटुंबातील १२ जणांचा अचानक मृत्यू झाल्याने कुंडारिया यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मोहन कुंडारिया राजकोटचे खासदार आहे. रविवारी त्यांच्या कुटुंबातील सदस्य सुट्टीचा आनंद घेण्यासाठी मोरबी पुलावर गेले होते. मात्र पूल दुर्घटनेत त्यांना देखील आपल्या जीवास मुकावं लागलं आहे.
मोरबी पूल दुर्घटना कशी घडली?
मोरबीमधील हा झुलता पूल पर्यटकांचे आकर्षण असून, गेल्या दोन वर्षांपासून तो बंद होता. नूतनीकरणानंतर २५ ऑक्टोबरला हा पूल नागरिकांसाठी खुला करण्यात आला होता. रविवारी सुट्टी असल्याने या पुलावर मोठी गर्दी झाली होती. या पुलाची क्षमता शंभर जणांची असून, दुर्घटना घडली त्या वेळी पुलावर सुमारे पाचशे लोक होते.
पूल कोसळल्याने हे लोक नदीत पडले. स्थानिक नागरिक आणि बचाव पथकाने पाण्यात उतरून लोकांना बाहेर काढले. लोकांना वाचवण्यासाठी रात्रभर बचावकार्य सुरू होते. आतापर्यंत या दुर्घटनेत जवळपास १४० जणांना आपला जीव गमावा लागला आहे. तर १७० हून अधिक लोकांना वाचवण्यात यश आले आहे.
PM मोदींकडून मृतांचा कुटुंबीयांना मदत जाहीर
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मृत्यू झालेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना पीएमएनआरएफ निधीतून दोन लाख रुपये तर जखमींना 50 हजार रुपये जाहीर करण्यात आले आहे. तर गुजरतचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी मुख्यमंत्री निधीतून मृतांच्या नातेवाईकांना चार लाख रुपये तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.
Edited By - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.