Eknath Shinde : CM एकनाथ शिंदे पुन्हा गुवाहाटीला जाणार; समर्थक आमदारांनाही सोबत नेणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) पुन्हा एकदा गुवाहाटीला जाणाच्या तयारीत आहे.
Eknath Shinde group
Eknath Shinde groupSaam TV
Published On

मुंबई : राज्यात एकीकडे आमदार बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यात खोक्यांवरून वाद पेटला असतानाच, दुसरीकडे राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) पुन्हा एकदा गुवाहाटीला जाणाच्या तयारीत आहे. विशेष म्हणजे शिंदे यांच्यासोबत त्यांचे समर्थक आमदारही गुवाहाटीला जाणार आहे.

Eknath Shinde group
Shivsena : BMC निवडणुकीपूर्वी ठाकरे गटाला धक्का? त्या कामांची 'कॅग'कडून चौकशी होणार

ठाण्यातील एका कार्यक्रमात बोलताना स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या गुवाहाटी दौऱ्याबाबत माहिती दिली आहे. या दौऱ्यात मुख्यमंत्री आणि त्यांचे समर्थक आमदार हे कामाख्या देवीचं दर्शन घेणार आहेत. त्यानंतर शिंदे सरकारमधील मंत्री आणि समर्थक आमदार अयोध्या वारीलाही जाणार आहेत. दरम्यान हा दौरा कधी असणार आहे, याबाबतची माहिती मिळालेली नाही.

तीन महिन्यापूर्वी राज्यात महाविकास आघाडीचं सरकार (Uddhav Thackeray) अस्तित्वात असताना, एकनाथ शिंदे यांनी ४० हून अधिक आमदारांसह शिवसेनेतून बंड केलं होतं. या आमदारांना घेऊन ते थेट गुवाहाटीला निघून गेले होते. शिंदे गटाचा गुवाहाटी दौरा चांगलाच गाजला होता.

Eknath Shinde group
Morbi Cable Bridge Collapses: मोरबी पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा 141 वर; प्रशासनाने दिले चौकशीचे आदेश

कारण शिंदे गटाचे आमदार शहाजी पाटील यांचा फोनवरील संभाषणाचा एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाला होता. त्यामध्ये त्यांनी “काय झाडी, काय डोंगार, एकदम ओक्केमध्ये आहोत”, असं विधान केलं होतं. त्यांचं हेच विधान चर्चेला कारण ठरलं होतं. इतकंच नाही तर या दौऱ्यावरून राज्यात खोक्यांचं राजकारणही पेटलं.

दरम्यान, शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकारचं बहुमत कमी झालं. त्यानंतर राज्यात नवीन शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झालं. या सगळ्या घडामोडींना आता तीन महिने पूर्ण झाले आहेत. आता पुन्हा एकदा एकनाथ शिंदे हे आपल्या समर्थक आमदारासंह गुवाहाटी दौरा करणार आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com