Ex-Boyfriends Harassment Saam
देश विदेश

प्रायव्हेट फोटोवरून ब्लॅकमेल, छळाला कंटाळून प्रसिद्ध मॉडेलची आत्महत्या; सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती उघड

Ex-Boyfriends Harassment: मॉडेल सुखप्रीत कौरच्या आत्महत्याप्रकरणी एक्स बॉयफ्रेंडला अटक. पोलिसांना सापडली सुसाईड नोट.

Bhagyashree Kamble

  • प्रसिद्ध मॉडेलची आत्महत्या.

  • एक्स बॉयफ्रेंडच्या छळाला कंटाळली.

  • पोलिसांना सापडलेल्या सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती उघड.

गुजरातमधील सुरतमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. मॉडेलच्या आत्महत्याप्रकरणी पोलिसांनी तिच्या एक्स लिव्ह इन पार्टनरला अटक केली आहे. मॉडेलचा एक्स बॉयफ्रेंड तिला वारंवार ब्लॅकमेल करीत होता. ब्रेकअप झाल्यानंतरही छळ सुरूच होता. एक्स बॉफ्रेंडने तरूणीला डांबून ठेवत बेदम मारहाणही केली होती. याच त्रासाला कंटाळून मॉडेल तरूणीनं आत्महत्या केली. पोलिसांना सुसाईड नोट सापडली असून, त्याच्या आधारे पोलिसांनी तपास करीत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

सुखप्रीत कौर (वय वर्ष १९) असे मॉडेल तरूणीचं नाव आहे. ती मुळची मध्य प्रदेशातील शिवपुरीतील रहिवासी होती. वर्षभरापूर्वी ती मॉडेलिंगमध्ये करिअर करण्यासाठी सुरतमध्ये आली होती. नंतर तिच्या बॉयफ्रेंडसोबत लिव्ह इनमध्ये राहण्यासाठी दिंडौलीमध्ये आली. मात्र, काही कारणास्तव दोघांमध्ये मतभेद झाले. वाद झाला आणि दोघांनी ब्रेकअप केला.

ब्रेकअप झाल्यानंतर सुखप्रीत कुंभारिया येथील सारथी रेसिडेन्सीमध्ये मैत्रिणींसोबत राहायला गेली. मात्र, ब्रेकअप झाल्यानंतरही एक्स बॉयफ्रेंडकडून छळ सुरूच होता. एक्स बॉयफ्रेंड तिला वारंवार खासगी फोटोंवरून ब्लॅकमेल करीत होता. तसेच मारहाणही केली. मृत्यूच्या आदल्या दिवशी ब्लेडनं तिच्या हातावर वार केले होते.

याच छळाला कंटाळून तिनं चार महिन्यांपूर्वी आत्महत्या केली असल्याची माहिती आहे. यानंतर पोलिसांनी तपासाला सुरूवात केली. पोलीस तपासात त्यांना एक सुसाईड नोट सापडली. हे पत्र तरूणीनं सुरतच्या पोलीस अधीक्षकांना उद्देशून लिहिले होते. त्यात तरूणीनं महेंद्रनं अमानुष वागणुकीबद्दल तसेच धमक्यांबाबत माहिती दिली आहे.

'महेंद्रनं ब्रेकअप झाल्यानंतर त्रास द्यायचे नाही सोडले. शारीरिक इजा तसेच खासगी फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. महेंद्रनं डांबून ठेवलं. नंतर बेदम मारहाणही केली. ब्लेडनं हातावर वारही केले', अशी माहिती पत्रातून देण्यात आली. या पत्रातून पोलिसांनी महेंद्र राजपूतविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.

यानंतर महेंद्र फरार झाला. गेल्या चार महिन्यांपासून तो बेपत्ता होता. विविध शहरांमध्ये फिरत होता. मात्र, बुधवारी सुरत पोलिसांनी महेंद्रला शोधून अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT