Surat Flood : गुजरातमधील सूरतमध्ये पुराचा हाहाकार झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून कोसळत असलेल्या पावसाने रस्त्यावर माणूस बुडेल इतकं पाणी वाहत आहे. सूरमधील अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. मुसळधार पावसामुळे शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. गुजरात राज्य सरकारने सूरतमधील एसटी सेवा तात्पुरती स्थगित केली आहे.
गुजरातमध्ये गेल्या २४ तासांत पावसाने कहर केला आहे. गुजरातमधील एकूण १५९ तालुक्यात हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची नोंद झाली. यामुळे राज्यातील विविध ठिकाणी पाणी साचलं आहे.
भारतीय हवामान विभागाने पुढील काही दिवस मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. अमरेली, भावनगर, नवसारी, वलसाड, बोटाड, अरावली, महिसागर, दाहोड, वडोदरा, आनंद, भरूच आणि पंचमहल जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्या आला आहे. या व्यतिरिक्त अलावा, बनासकांठा, साबरकांठा, तापी, सूरत, डांग, मेहसाणा, गांधीनगर, अहमदाबाद, सुरेंद्रनगर, खेडा, राजकोट, गिर सोमनाथ, जूनागढ, छोटा उदेपूर आणि नर्मदामध्येही पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.
सूरतच्या कापोद्रा परिसरात पाणी साचले आहे. या भागातील नागरिक आणि विद्यार्थी जीव धोक्यात घालून पाण्यातून वाट काढत आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे लोकांचे हाल झाले आहेत. पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलंय. पाणी साचल्याने वाहने एकाच जागेवर थांबली आहेत. भरपावसात लोक पाण्यातून वाहने बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत.सूरतमधील वडवाला सर्कलमधील श्रीजी नगरजवळ पावसाचे पाणी साचलंय. पावसामुळे परिसरातील जनजीवन विस्कळीत झालं आहे.
पालघर जिल्ह्यात काल मुसळधार झालेल्या पावसानंतर आज पावसाने थोडीशी उसंत घेतली आहे. मात्र, तरीही पालघर जिल्ह्याला आज आणि उद्या हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे पालघर जिल्ह्यातील काही भागात मुसळधार तर काही भागात अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.