Luxury Bus Accident saam tv
देश विदेश

Luxury Bus Accident: भरधाव लक्झरी बस ट्रकला पाठीमागून धडकली, भीषण अपघातात ६ जणांचा मृत्यू, २६ जखमी

Road Accident India: गुजरातमधील वडोदरा–जरोद रोडवर लक्झरी बसने ट्रकला जोरात धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू झाला असून 26 प्रवासी जखमी झाले आहेत. बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.

Surabhi Jayashree Jagdish

गुजरातमध्ये वडोदरा–जरोद रोडवर कोटंबी गावाजवळ सकाळी एक भीषण अपघात घडला. या अपघातात एक लक्झरी बस पुढे उभ्या असलेल्या ट्रकला जोरात धडकली. धडकेची तीव्रता इतकी जास्त होती की बसचा पुढचा भाग पूर्णपणे ट्रकमध्ये अडकून बसलाय. या अपघातात 6 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून सुमारे 26 जण जखमी झाले आहेत.

ही घटना घडताच जखमींना तात्काळ जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. काही प्रवासी बसमध्ये अडकले असल्याची माहिती मिळाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर बचावकार्य सुरू करण्यात आलं.

ही बस राजस्थानमधील बांसवाडामधून सूरतकडे जात होती. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, चालकाला प्रवासादरम्यान झोप लागल्यामुळे हा अपघात घडला आणि बस थेट समोर उभ्या असलेल्या ट्रकवर जाऊन आदळली. अपघातानंतर घटनास्थळी मोठा गोंधळ आणि आरडाओरड झाला. स्थानिक लोकांनी लगेच पोलिसांना माहिती दिली आणि मदतकार्य सुरू केले.

घटनेनंतर जरोद पोलिसांसह एसडीआरएफ, एनडीआरएफ आणि वडोदरा अग्निशमन विभागाच्या टीम्स घटनास्थळी दाखल झाल्या. जखमी आणि अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. सर्व जखमींना तातडीने वडोदऱ्यातील येथील एसएसजी रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.

या अपघातामुळे वडोदरा–जरोद हायवेवर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. मृतांच्या मृतदेहांना पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आलं असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. घटनास्थळी अजूनही बचावकार्य सुरू असून परिस्थिती गंभीर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: महाराष्ट्रातील खासदारांना ५० कोटींना विकत घेतलं जात आहे, महत्त्वाच्या व्यक्तीने दिली माहिती - संजय राऊत

Solapur Bhuikot Fort : सोलापूरच्या किल्ल्याला 'भुईकोट' नाव कसं पडलं? 'हे' आहे रंजक कारण

Gold Rate Today : आनंदाची बातमी! सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण, वाचा मुंंबई-पुण्याचे ताजे दर

Famous Actor : "माझ्या पत्नीने माझ्यासोबत एका बेडवर झोपायला नकार दिला..."; प्रसिद्ध अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा, नेमकं कारण काय?

Maharashtra Politics: आता राडा होणारच, राज्य गप्प बसणार नाही; संजय राऊतांचा फुटीर खासदारांना इशारा

SCROLL FOR NEXT