PM Narendra Modi On Rahul Gandhi Saam Tv
देश विदेश

PM Narendra Modi Rally : शहजादाला पंतप्रधान करण्यासाठी पाकिस्तानात प्रार्थना : PM मोदींचा राहुल गांधींवर पुन्हा निशाणा

Gujarat Loksabha Election 2024: 'राजकुमारला पंतप्रधान बनवण्यासाठी पाकिस्तान उतावळा झालाय.', अशी टीका त्यांनी केली. यावेळी त्यांनी काँग्रेसवर पुन्हा आरोप केला आहे की, 'मुस्लिमांना धर्माच्या आधारावर आरक्षण देण्याची काँग्रेसची इच्छा आहे.'

Priya More

लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या सध्या देशभरामध्ये प्रचारसभा होत आहेत. सध्या ते गुजरातमध्ये असून त्यांची आनंद येथे जाहीर प्रचारसभा झाली. या प्रचारसभेत पीएम मोदींनी पुन्हा एकदा काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर निशाणा साधला. त्यांनी यावेळी पाकिस्तानचे नाव घेत काँग्रेसला (Congress) घेरण्याचा प्रयत्न केला. 'राजकुमारला पंतप्रधान बनवण्यासाठी पाकिस्तान उतावळा झालाय.', अशी टीका त्यांनी केली. यावेळी त्यांनी काँग्रेसवर पुन्हा आरोप केला आहे की, 'मुस्लिमांना धर्माच्या आधारावर आरक्षण देण्याची काँग्रेसची इच्छा आहे.'

पीएम मोदी काँग्रेसवर निशाणा साधत म्हणाले की, 'इकडे काँग्रेस मरत आहे तर तिकडे पाकिस्तान रडत आहे. काँग्रेससाठी पाकिस्तानी नेते प्रार्थना करत आहेत. शहजादेला पंतप्रधान बनवण्यासाठी पाकिस्तान उतावळा आहे. तुम्ही ते पाहिलेच असेल. पाकिस्तान आणि काँग्रेसची पार्टनरशीप आता पूर्णपणे उघड झाली आहे. देशाच्या शत्रूंना आज भारतामध्ये मजबूत सरकार नकोय तर त्यांना कमजोर सरकार पाहिजे.'

'संविधान बदलून मुस्लिमांना धर्माच्या आधारावर आरक्षण देण्याची काँग्रेसची इच्छा आहे.', असा आरोप पीएम मोदी यांनी गुजरातमधील सभेतून पुन्हा एकदा केला. मुस्लिम व्होटबँकेवर इतर पक्षांच्या दाव्यानंतर काँग्रेसला हे करणे भाग पडले आहे, असे देखील ते म्हणाले. यावेळी त्यांनी काँग्रेस आणि राहुल गांधी यांना तीन आव्हाने देत लेखी स्वरुपात लिहून देण्यास सांगितले.

पीएम मोदी यावेळी म्हणाले की, काँग्रेस आणि संपूर्ण इको सिस्टमसाठी तीन आव्हाने आहेत. पहिले आव्हान म्हणजे, 'राज्यघटना बदलून मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही अशी लेखी हमी काँग्रेसने देशाला द्यावी. देशाचे विभाजन करून चालणार नाही.'

मोदांनी काँग्रेसला दिलेले दुसरे आव्हान म्हणजे, 'एससी-एसटी आणि ओबीसींना दिलेल्या आरक्षणात काँग्रेसने कोणताही अडथळा येणार नाही. असे लेखी स्वरुपात देशाला द्यावे.'

तिसरे आव्हान म्हणजे, 'काँग्रेसने देशाला पत्र लिहून हमी द्यावी की ज्या राज्यांमध्ये काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष सत्तेत आहेत ते कधीही घाणेरडे वोट बँकेचे राजकारण करणार नाहीत. ओबीसी कोटा कमी करून मुस्लिमांना आरक्षण देणार नाहीत.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thursday Horoscope : तुमचा साधेभोळेपणा इतरांना भावणार; ५ राशींच्या लोकांना अचानक धनलाभ होणार, वाचा गुरुवारचं राशीभविष्य

Dhananjay Munde : मुंबईत कोट्यवधींचं घर; मुंडे मात्र 'सातपुडा'वर, कारण काय? VIDEO

Navpancham Rajyog: 30 वर्षांनंतर शनी बनवणार नवपंचम राजयोग, 'या' राशींना मिळू शकणार भरपूर धन संपत्ती

Sachin Tendulkar Son : सचिनचा मुलगा अर्जुनचा साखरपुडा झाला; कोण आहे तेंडुलकर घराण्याची होणारी सून?

Bank Charges: महत्त्वाची बातमी; आता बँक व्यवहारांवर आकारणार शुल्क, कधीपासून लागू होणार नियम?

SCROLL FOR NEXT