Gujarat school bomb threat Saam TV
देश विदेश

Gujarat News: गुजरातमधील अनेक शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी; विद्यार्थ्यांसह पालक धास्तावले, पोलिसांची धावपळ

Gujarat school bomb threat: गुजरामधून एक मोठी बातमी समोर आली आहे. अहमदाबाद येथील अनेक शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे.

Satish Daud

गुजरामधून एक मोठी बातमी समोर आली आहे. अहमदाबाद येथील अनेक शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. एका अज्ञात व्यक्तीने ई-मेलवरून ही धमकी दिली आहे. या ईमेलनंतर पोलीस सतर्क झाले असून शाळांमध्ये शोधमोहीम राबवली जात आहे. यामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

या घटनेमुळे विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. सध्या तरी पोलीस पथकाला कोणतीही बॉम्बसदृश्य वस्तू सापडलेली नाही. बॉम्बशोधक पथकही घटनास्थळी हजर आहे. विद्यार्थी आणि पालकांनी घाबरून जाऊ नये, असं आवाहन अहमदाबाद प्रशासनाने केलं आहे.

घटनेबाबत सायबर गुन्हे शाखेच्या पोलिस उपायुक्त लवीना सिन्हा यांनी सांगितले की, "अहमदाबादमधील काही शाळांना सोमवारी ईमेलद्वारे बॉम्बने उडवून देण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. आतापर्यंत ८ शाळांना धमकीचे मेल आले आहेत. यासंदर्भात आमच्याकडे तक्रारी देखील दाखल झाल्या आहेत. सध्या पोलिसांकडून शोधमोहिम सुरू आहे".

हा धमकीचा मेल एका रशियन हँडलरकडून आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. गुजरातमधील लोकसभेच्या २५ जागांसाठी मंगळवारी मतदान होणार आहे. यापार्श्वभूमीवर मोठी खबरदारी घेतली जात आहे. दरम्यान, अगदी दोन दिवसांपूर्वीच दिल्लीतील १०० हून शाळांनाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली होती.

एका अज्ञात व्यक्तीने हे धमकीचे ई-मेल पाठवले होते. याप्रकरणी पोलिसांनी एफआयआर देखील नोंदवला होता. पोलिसांनी सांगितले होते की, "बॉम्बशी संबंधित ईमेल पाठवणाऱ्या व्यक्तीचा उद्देश “सामान्य दहशत निर्माण करणे आणि सार्वजनिक सुव्यवस्था बिघडवणे” हा होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope: जुन्या मित्रांची होईल भेट, जोडीदाराचा सुटेल अबोला; जाणून घ्या तुमची राशीत आहे काय?

Assembly Election: राज्यात जातीवर आधारित मतदान नाही; अजित पवारांच्या विधानाने महायुतीला टेन्शन

Horoscope : तुम्हाला अचानक… राशीत काय? चांगलं की वाईट?

India vs South Africa: वर्ल्ड चॅम्पियन्सचा नाद करायचा नाय! भारताचा द.आफ्रिकेवर मोठा विजय; ३-१ ने मालिका जिंकली

IND vs SA: पैसा वसूल मॅच! संजू - तिलकची शतकं; भारताने उभारला रेकॉर्ड ब्रेकिंग स्कोअर

SCROLL FOR NEXT