ED Raid: मंत्र्याच्या PA कडे सापडलं कोट्यवधींचं घबाड; पैशांचा नुसता ढीग, नोटा मोजून ईडी अधिकारीही थकले

ED raid in Jharkhand: झारखंडचे ग्रामीण विकास मंत्री आलमगीर आलम यांच्या पीएच्या घरी काम करणाऱ्या एका नोकराच्या घरावर ईडीने धाड टाकली. यावेळी कोट्यवधी रुपये आढळून आले.
ED raid in Jharkhand
ED raid in JharkhandANI

ED raid in Jharkhand

देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना ईडीने काँग्रेस मंत्र्याच्या खासगी सचिवाकडे काम करणाऱ्या एका नोकराच्या घरावर भल्यापहाटे छापा टाकला. यावेळी कोट्यवधींचं घबाड आढळून आलं. पैशांचा ढीग पाहून ईडी अधिकाऱ्यांनाही घाम फुटला. नोटा मोजण्यासाठी मशीनी मागवण्यात आल्या आहेत.

ED raid in Jharkhand
Breaking News: अमेठीत काँग्रेस कार्यालयाबाहेर उभ्या असलेल्या १० ते १२ वाहनांची तोडफोड; भाजपवर गंभीर आरोप

या नोटा नेमक्या कुठून आल्या? याची चौकशी केली जात आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ईडीने सोमवारी पहाटेच्या सुमारास झारखंडमधील रांची शहरात अचानक छापेमारी केली. झारखंडचे ग्रामीण विकास मंत्री आलमगीर आलम यांच्या पीएच्या घरी काम करणाऱ्या एका नोकराच्या घरावर ईडीने धाड टाकली.

यावेळी जवळपास २५ कोटी रुपयांचं घबाड सापडलं. नोटांचा ढीग पाहून ईडी अधिकारीही चक्रावले. पैसे मोजण्यासाठी बँकेतून कर्मचारी आणि मशीन मागवण्यात आल्या आहेत. सध्या ईडीचे अधिकारी नोकराची कसून चौकशी केली आहे.

दरम्यान, हे पैसे मंत्री आलमगीर आलम यांचे खासगी सचिव संजीव लाल यांचे असल्याचं नोकराने सांगितलं आहे. निवडणुकीच्या काळात इतक्या मोठ्या प्रमाणात रक्कम जप्त झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. गेल्या वर्षी ईडीच्या पथकाने झारखंडमध्ये छापेमारी केली होती.

झारखंड ग्रामीण विकास विभागाचे मुख्य अभियंता वीरेंद्र के राम यांच्याशी संबंधित एकूण २४ ठिकाणी छापे टाकले होते. या काळात वीरेंद्र राम यांनी स्थापन केलेल्या कंपन्यांव्यतिरिक्त १०० कोटी रुपयांची मालमत्ता उघड झाली.

छाप्यामध्ये दीड कोटी रुपयांचे दागिने आणि लाखोंची रोकडही सापडली होती. यानंतर ईडीने तपासासाठी IIR म्हणून जमशेदपूर मॉनिटरिंग स्टेशनमध्ये ग्रामीण विकास विभागाच्या एका अभियंत्याविरुद्ध लाचखोरीचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com