Woman Burnt to Death Saam Tv News
देश विदेश

'आईला लाईटरनं जाळलं' नवऱ्यानं ७ वर्षीय चिमुकल्यासमोर बायकोला संपवलं, ३५ लाखांसाठी छळ

Woman Burnt to Death: ग्रेटर नोएडामध्ये हुंड्यासाठी विवाहित निक्कीला जिवंत जाळून ठार मारलं. पती व सासरच्यांनी ३५ लाख रुपयांच्या मागणीसाठी वारंवार छळ केला होता.

Bhagyashree Kamble

  • ग्रेटर नोएडामध्ये हुंड्यासाठी विवाहित निक्कीला जिवंत जाळून ठार मारलं.

  • पती व सासरच्यांनी ३५ लाख रुपयांच्या मागणीसाठी वारंवार छळ केला होता.

  • निक्कीच्या मुलानं सांगितलं की, पित्याने आईला लाईटरने पेटवून मारलं.

  • पोलिसांनी पतीसह सासरच्या चौघांविरोधात गुन्हा दाखल केला असून परिसरात खळबळ उडाली आहे.

उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथे एक हृदयद्रावक घटना घडली आहे. हुंड्याच्या मागणीसाठी विवाहित महिलेची निर्घृण हत्या करण्यात आली. धक्कादायक म्हणजे, आरोपी पतीनं आपल्या मुलासमोरच पत्नीच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला जिवंत जाळलं. पीडित महिला मदतीसाठी आक्रोश करत राहिली, मात्र वेदनांनी तडफडत तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना ग्रेटर नोएडातील सिरसा गावात घडली. मृत महिलेचं नाव निक्की असून तिचं २०१६ साली विपिन नावाच्या व्यक्तीसोबत लग्न झालं होतं. लग्नावेळी निक्कीच्या घरच्यांनी स्कॉर्पिओ कारसह मोठा हुंडा दिला होता. तरीदेखील पतीसह सासरच्यांकडून सातत्याने अधिक हुंड्याची मागणी होत होती.

निक्कीच्या बहिणी कांचन हिने दिलेल्या माहितीनुसार, २१ ऑगस्ट रोजी विपिन आणि त्याच्या कुटुंबीयांनी निक्कीला बेदम मारहाण केली. त्यानंतर ३५ लाख रुपयांची मागणी करत विपिननं तिच्या अंगावर पेट्रोल शिंपडून लाईटरने आग लावली. हे सर्व निक्कीच्या मुलासमोर घडलं. पप्पानं आईला लाईटरनं जाळून टाकलं, असं चिमुकला म्हणाला.

कांचनच्या तक्रारीनुसार, पोलिसांनी या प्रकरणात कारवाई करत आरोपी पती विपिन, रोहित, सासू आणि सासरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर कसना पोलीस ठाण्यात निक्कीचे कुटुंब जमले असून, त्यांनी सासरच्या मंडळींविरोधात संताप व्यक्त केला आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबई-नवी मुंबईत मुसळधार पावसाला सुरूवात

शत्रूला भरणार धडकी! ऑपरेशन सिंदूरनंतर अवघ्या ३ महिन्यांत नवी एअर डिफेन्स सिस्टम; एकाचवेळी ३ टार्गेट्सवर साधणार निशाणा | VIDEO

Nagpur Smart City: राज्यातील ३५०० गावे स्मार्ट अन् इंटेलिजेंट होणार, नागपूरमध्ये पहिला प्रयोग, गावकऱ्यांना काय फायदा होणार?

Ganesh Chaturthi 2025: ५०० वर्षांनी गणेश चतुर्थीचा अनोखा योग, 'या' ३ राशींचे जीवन बदलवणार दुर्मिळ योगायोग

Liver Transplant: यकृत प्रत्यारोपण दांम्पत्याच्या जीवावर बेतलं; डॉक्टरांचा हलगर्जीपणा,नातेवाईकांचा आरोप

SCROLL FOR NEXT