
विजय थलापती यांनी मदुराई अधिवेशनातून २०२६ निवडणूक स्वतंत्रपणे लढवण्याची घोषणा केली.
भाजप आणि द्रमुकसोबत कोणत्याही परिस्थितीत युती होणार नसल्याचं स्पष्ट केलं.
भाजपवर जनतेच्या गरजांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला.
मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनाही थलापतींनी "स्टॅलिन अंकल" म्हणत जोरदार टीका केली.
अभिनेता विजय थलापती यांच्या पक्षाचं तमिळग विदुथलाई काची (टीव्हीके)चं दुसरं राज्यस्तरीय संमेलन मदुराईमध्ये पार पडलं. या संमेलनात भाषण करताना विजय थलापती यांनी २०२६मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका स्वतंत्रपणे लढवण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे डीएमके आणि बीजेपी पक्षाला मोठा धक्का मानला जात आहे.
या निर्णयाबाबत विजय थलापती म्हणाले, 'भाजपसोबत आमच्या विचारांमध्ये टोकाचे मतभेद आहेत. तर डीएमके हा आमचा राजकीय शत्रू आहे. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आमचा पक्ष कोणत्याही परिस्थितीत या दोन पक्षांशी युती करणार नाही', अशा स्पष्ट शब्दांत विजय थलापती यांनी माहिती दिली.
काही दिवसांपूर्वी विजय थलापती यांचा पक्ष तामिळनाडूमध्ये बीजेपीसोबत युती करू शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. तशी चर्चाही होती. भाजपालाही आशा होती. यामुळे तामिळनाडूमध्ये भाजपची ताकद वाढणार होती.
मात्र, आता विजय थलापती यांनी २०२६ ची आगामी विधानसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे भाजपाला हा मोठा धक्का मानला जातआहे.
विजय थलापती म्हणाले, 'टीव्हीके ही कुणालाही घाबरणारी पार्टी नाहीये. आम्ही चुकीचं समर्थन करत नाही. तसेच चुकीचं काही करतही नाही. तामिळनाडूची ताकद पाठीशी आहे. चला, आपण सगळेच भाजप आणि द्वेषाचं राजकारण करणाऱ्या द्रमुकविरोधात उभे राहुया' , असं थलापती म्हणाले.
यावेळी त्यांनी भाजपवरही निशाणा साधला. 'भाजप तामिळनाडूतील जनतेच्या खऱ्या गरजांकडे दुर्लक्ष करीत आहे. २०२९ चा प्रवास सोपा असल्याचा तुमचा गैरसमज आहे. लक्षात ठेवा, दवबिंदू कमळाच्या पाकळ्यांवर जास्त काळ टिकत नाही. तामिळनाडूची जनता कधीच भाजपची साथ देणार नाही', असं थलापती म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.