Govt appoints Prof. Santishree Dhulipudi Pandit of Savitribai Phule University as the new vice-chancellor of JNU. Saam Tv
देश विदेश

JNU च्या पहिल्या महिला कुलगुरूपदी शांतीश्रि पंडित; जाणून घ्या त्यांच्याविषयी

हिंदी, इंग्रजी, मराठी, तमिळ, कन्नड, मल्याळम आणि कोकणी भाषेवर प्रा. पंडित यांचे प्रभुत्व.

साम न्यूज नेटवर्क

सातारा : सावित्रीबाई फुले विद्यापीठात (Savitribai Phule University) कार्यरत असलेल्या प्रा. शांतीश्रि धुलीपुडी पंडित (Santishree Dhulipudi Pandit) यांची दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे. जेएनयूच्या पहिल्या महिला कुलगुरू (chancellor of JNU) म्हणून पंडित या कार्यभार सांभाळणार आहेत. (Santishree Dhulipudi Pandit Latest News)

प्रा.शांतीश्रि धुलीपुडी पंडित यांची दिल्ली (delhi) येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून पाच वर्षांसाठी असणार आहे (First Women VC Of JNU). जेएनयूमध्ये प्रभारी कुलगुरूपदाचा कार्यभार सांभाळणारे एम जगदेश कुमार यांची गेल्या आठवड्यात विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळं रिक्त जागेवर प्रा.शांतीश्रि धुलीपुडी पंडित यांची नियुक्ती करण्यात आली आहे. (Santishree Dhulipudi Pandit Marathi News).

प्रा.शांतीश्रि धुलीपुडी पंडित यांच्या विषयी

पुणे (pune) विद्यापीठात राजकारण आणि लोकप्रशासन हे विषय शिकवणा-या प्रा. पंडित (Santishree Dhulipudi Pandit Latest Marathi News) यांचा जन्म रशियातील सेंट पीटर्सबर्ग येथे झाला आहे. त्यांनी सुरुवातीचे शिक्षण चेन्नई येथे केले आणि जेएनयूमधून एम.फिलमध्ये टॉप केले. त्यानंतर त्यांनी येथून पीएचडीही केली. 1996 मध्ये त्यांनी स्वीडनच्या उप्पसाला विद्यापीठातून डॉक्टरेट डिप्लोमा प्राप्त केला. हिंदी, इंग्रजी, मराठी, तमिळ कन्नड, मल्याळम आणि कोकणी भाषेवर त्यांचे प्रभुत्व आहे.

पंडित यांनी नामांकित विद्यापीठांमध्ये अध्यापन केले आहे

प्रा. पंडित यांचे वडील नागरी सेवेत होते. आई लेनिनग्राड (आताचे सेंट पीटर्सबर्ग) ओरिएंटल फॅकल्टी विभागात तमिळ आणि तेलुगूच्या प्राध्यापक होत्या. प्राध्यापक शांतीश्री धुलीपुडी पंडित, ज्यांना अध्यापनाचा 34 वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे, त्यांनी पुणे विद्यापीठाव्यतिरिक्त गोवा विद्यापीठ, उस्मानिया विद्यापीठ, रक्षाशक्ती विद्यापीठ, मद्रास विद्यापीठात विस्तार केला आहे. याशिवाय केंद्र सरकारच्या अनेक महत्त्वाच्या समित्यांमध्येही त्यांचा सहभाग आहे. आंतरराष्ट्रीय विषयांवर उत्तम पकड असलेल्या प्राध्यापकांनी अनेक संशोधन प्रकल्पांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. जगातील अनेक नामांकित संस्थांमध्ये त्यांची फेलोशिप आहे. त्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक सन्मानांनी गौरविण्यात आले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: हिंगोलीत मुसळधार पाऊस, इसापूरमध्ये गावकरी अडकले

बीडचा उद्योजक तरूण गर्लफ्रेंडला भेटायला सोलापुरात गेला, कारमध्ये आढळला मृतदेह; पोलिसांना वेगळाच संशय

Karishma Kapoor Children: संजय कपूरच्या प्रॉपर्टीत हिस्सा पाहिजे; करिश्मा कपूरच्या मुलांची हायकोर्टात धाव, नेमका वाद काय?

Maharashtra Tourism: नैसेर्गिक सौंदर्य अन् मनमोहक दृश्ये; मालेगावपासून हाकेच्या अंतरावर वसलंय एक सुंदर ठिकाण, एकदा भेट द्याच

Bharli Vangi Recipe : गावरान भरली वांगी, रेसिपी पाहून तोंडाला सुटेल पाणी

SCROLL FOR NEXT