कॅमेरून : आफ्रिका कप ऑफ नेशन्स फुटबाॅल अजिंक्यपद (Africa Cup of Nations championship) स्पर्धेतील अंतिम सामन्यात सेनेगलने (Senegal) इजिप्तचा (Egypt) पराभव करुन पहिल्यांदाच करंडकावर नाव काेरले. कॅमेरूनच्या याउंडे येथील ओलेम्बे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात सेनेगलने पेनल्टी किकवर अजिंक्यपद (senegal won africa cup of nations) पटकाविले. (Africa Cup Of Nations News)
सेनेगल आणि इजिप्त संघातील खेळाडूंना सामन्याच्या निर्धारित वेळेत एकही गाेल नाेंदविता आला नाही. इजिप्तचा मारवान हमदी आणि सेनेगलच्या अब्दो डायलो यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन घडविले. (Africa Cup Of Nations Latest Marathi News)
पेनल्टी बॉक्समध्ये इजिप्त संघातील खेळाडूच्या फाऊलनंतर सॅडियो मानेची (Sadio Mane) पेनल्टी किक सातव्या मिनिटाला गोलरक्षक मोहम्मद अबू गबाल (goalkeeper Mohamed Abou Gabal) ज्याची गाबास्की म्हणून देखील ओळख आहे. त्याने नेत्रदीपक पद्धतीने गाेल वाचवला. दाेन्ही संघातील गाेलकीपरने उत्कृष्ट खेळी (football) करीत गाेल वाचविले. (Football Latest Marathi News)
त्यानंतर सामना पेनल्टी किकमध्ये गेला. यामध्ये सॅडियो मानेने (Sadio Mane) संघास विजय मिळवून दिला. त्यानंतर सेनेगलच्या क्रीडाप्रेमींनी (sports) जल्लाेष केला.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.