pm modi distribute seventy-thousand appointment letters to newly inducted recruits  Saam Tv
देश विदेश

Government Job News: सुमारे 70,000 तरुणांना मिळणार सरकारी नोकरी, 13 जूनला मोदींच्या उपस्थित महारोजगार मेळावा

सुमारे 70,000 तरुणांना मिळणार सरकारी नोकरी, 13 जूनला मोदींच्या उपस्थित महारोजगार मेळावा

साम टिव्ही ब्युरो

Government Jobs 2023: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 13 जून रोजी सरकारी नोकरीत नव्याने भर्ती झालेल्या सुमारे 70,000 उमेदवारांना नियुक्ती पत्रे वितरीत केले जाणार आहेत. हा कार्यक्रम सकाळी 10:30 वाजता सुरु होईल ज्यात पंतप्रधान मोदी हे व्हर्चुअली उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान या नवनियुक्त कर्मचाऱ्यांना यावेळी मार्गदर्शनही करतील.

देशभरात 43 ठिकाणी रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमा अंतर्गत, केंद्र सरकारच्या आणि राज्य/केंद्रशासित प्रदेश सरकारच्या विविध विभागांमध्ये भर्ती केली जात आहे.

देशभरातून निवड झालेले नवनियुक्त कर्मचारी, वित्तीय सेवा विभाग, टपाल विभाग, शालेय शिक्षण विभाग, उच्च शिक्षण विभाग, संरक्षण मंत्रालय, महसूल विभाग, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, अणुऊर्जा विभाग, रेल्वे मंत्रालय, लेखापरीक्षण आणि लेखा विभाग, अणुऊर्जा विभाग आणि गृह मंत्रालय, यासह विविध सरकारी विभागांच्या सेवेत दाखल होतील. (Latest Marathi News)

केंद्र सरकारचं म्हणणं आहे की, रोजगार मेळावा हे रोजगार निर्मितीला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या पंतप्रधानांच्या वचनबद्धतेच्या पूर्ततेच्या दिशेने एक पाऊल आहे. रोजगार मेळा भविष्यातील रोजगार निर्मितीला चालना देईल, आणि तरुणांना त्यांच्या सक्षमीकरणासाठी आणि राष्ट्रीय विकासात सहभागासाठी अर्थपूर्ण संधी प्रदान करेल, अशी अपेक्षा आहे.

नव्याने नियुक्त झालेल्यांना भारत सरकारच्या कर्मयोगी पोर्टलवरील, कर्मयोगी प्रारंभ या ऑनलाइन मॉड्यूल द्वारे स्वयं-प्रशिक्षणाची संधी देखील मिळत असून, या ठिकाणी, ‘कोठेही आणि कोणत्याही डिव्हाईसवर’ शिकता येण्याजोगे 400 पेक्षा जास्त ई-लर्निंग अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bogus Doctor : बोगस डॉक्टरांचे पितळ उघडे; पदवी नसताना रुग्ण तपासणी, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र-तेलंगनाचा संपर्क तुटला; सीमेवरील पोडसा पूल पाण्याखाली

Government Apps: आता मोबाईलवर मिळणार सरकारी सेवा; फक्त एका क्लिकमध्ये, वाचा सविस्तर

Accident : भयंकर अपघात! दोन कारची समोरासमोर धडक, होरपळून ८ जणांचा जागीच मृत्यू

Ladki Bahin Yojana: १२ हजार पुरुषांनी लाटले लाडकीचे पैसे, सरकारला लावला १६२ कोटींचा चुना, RTI मधून धक्कायदाक माहिती समोर

SCROLL FOR NEXT