engineer disproportionate assets case PTI
देश विदेश

२ कोटी कॅश, १३ फ्लॅट्स, ५ आलिशान घरं... सरकारी इंजिनिअरची 'काळी कमाई' पाहून अधिकारीही चक्रावले

engineer disproportionate assets case : एका सरकारी अभियंत्याच्या घरी व्हिजिलन्स विभागाने धाड टाकून २ कोटींहून अधिक रोकड, १३ फ्लॅट्स, आलिशान घरे, दागिने आणि बेहिशेबी मालमत्तेची कागदपत्रे जप्त केली.

Namdeo Kumbhar

ओडिशातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Vigilance) लाचखोर अधिकाऱ्यांच्या विरोधात धडक मोहीम राबवली आहे. शनिवारी त्यांनी एका सरकारी इंजिनिअरच्या घरी धाड टाकली. त्यांनी उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती (Disproportionate Assets) बाळगल्याप्रकरणी एका सहाय्यक अभियंत्याला (Assistant Engineer) ताब्यात घेण्यात आले आहे. या छाप्यात जप्त झालेली रोकड आणि बेनामी संपत्ती पाहून तपास अधिकारीही चक्रावून गेले आहेत. सरकारी इंजिनिअरकडे २ कोटींचा कॅश, आलिशान घरे आणि फ्लॅट्स आढळल्याने तपास अधिकारीही थक्क झाले.

ओडिशातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या एका पथकाने शनिवारी कंधमालातील बालिगुडा येथील एकात्मिक आदिवासी विकास संस्थेत (ITDA) कार्यरत असलेले सहायक कार्यकारी अभियंता बैकुंठ नाथ बेहरा यांच्या घरी धाड मारली. त्यांच्या निवासस्थानी बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी कारवाई केली. या छाप्यात अभियंत्याच्या बँक लॉकरमधून २ कोटींहून अधिक रुपयांची रोकड आणि कोट्यवधी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता जप्त केल्याची माहिती समोर आली आहे. सरकारी बाबूच्या काळ्या कमाईची देशात चर्चा सुरू आहे.

अधिकाऱ्याने सांगितले की, कोर्टाने शुक्रवारी बैकुंठ नाथ बेहरा यांच्याविरोधात एक वॉरंट जारी केले होते, त्यानुसार आम्ही एकाचवेळी ९ ठिकाणी ठापे टाकले. यामध्ये भुवनेश्वरमधील नीलाद्री विहार, शैलाश्री विहार, कानन विहार आणि चंद्रशेखरपूर येथील निवासस्थाने, तसेच जाजपूर जिल्ह्यातील धर्मशाळा येथील त्यांचे वडिलोपार्जित घर, बारीपाडा येथील नातेवाईकांची घरे, बालिगुडा येथील त्यांची कार्यालयातील खोली आणि शासकीय निवासस्थान यांचा समावेश होता. या कारवाईत मोठ्या प्रमाणावर रोकड (कॅश), सोन्याचे दागिने आणि बेनामी मालमत्तेची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.

बैकुंठ नाथ बेहरा यांनी घरात लपवून ठेवलेली रोकड पाहून तपास अधिकाऱ्यांचे डोळे पांढरे झाले. घराच्या कोपऱ्यांमधून, कपाटांमधून नोटांचे बंडल जप्त केले. सर्व रक्कम इतकी होती की मोजण्यासाठी मशीन मागवाव्या लागल्या. प्राथमिक अंदाजानुसार ही रक्कम २ कोटींपेक्षा जास्त आहे. फक्त रोकडच नाही तर या सरकारी बाबूने काळ्या पैशांच्या जोरावर अनेक ठिकाणी गुंतवणूक केल्याचेही तपासात उघड झाले आहे. घरातून मोठ्या प्रमाणावर सोन्या-चांदीचे दागिने जप्त करण्यात आले. त्याने जमा केलेली घरे, फ्लॅट्सही जप्त करण्यात आले आहेत. त्याशिवाय अनेक नामांकित बँकांमध्ये असलेली खाती, फिक्स डिपॉझिट्स आणि शेअर्समधील गुंतवणुकीचे दस्तऐवज पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Crime : संसाराचा भयंकर शेवट, मध्यरात्री १ वाजता बेडरूममध्ये नवऱ्याने केलं भयंकर कृत्य, पत्नीचा मृत्यू होताच...

Famous Actress : बिग बॉस फेम अभिनेत्रीच्या मुंबईतील घरात ७६ लाखांची चोरी, बिहारमधून आरोपीला अटक

Maharashtra News Live Update: धाराशिव- तुळजाभवानी देवीच्या चरणी ९६७ ग्रॅम वजनाचा चांदीचा टोप अर्पण

Honey Trap : खळबळ! भाजप बड्या नेत्याचा तरुणीसोबतचा प्रायव्हेट व्हिडिओ व्हायरल; दाम्पत्याने रचला भयंकर कट

High cholesterol: कोलेस्ट्रॉल कमी करायचंय मग औषधं सोडा; दररोजच्या या 5 सवयींमुळे मेणासारखी वितळेल रक्तवाहिन्यंमधील चरबी

SCROLL FOR NEXT