Google maps Saam Tv
देश विदेश

Assam News : Google maps चा वापर अन् पोलिसांना खावा लागला मार, नेमकं प्रकरण काय?

Assam Police News : आसाम पोलीस दलातील एक टीम आरोपीच्या मागावर गेली होती. रात्री प्रवास करताना त्यांनी गुगल मॅपचा वापर केला. मॅपवरील रस्त्यावर जाताना ते हरवून राज्याच्या बाहेर गेले.

Yash Shirke

Google Maps Mistakes : गुगल मॅप्सचा वापर करताना नेहमी आजूबाजूला पाहणे आवश्यक असते. याचा वापर फायदेशीर असला तरीही ते १००% अचूक नसते. गुगल मॅप्स वापरल्याने रस्ता चुकलो असं आपल्या सर्वांसोबत एकदातरी झाले असेलच. असाच प्रकार आसाम पोलिसांसोबत झाला आहे. आसामच्या पोलिसांनी गुगल मॅपचा वापर केला आणि ते राज्याच्या सीमा ओलांडून नागालँडमध्ये घुसले.

आसामच्या जोरहाट जिल्ह्यातील पोलिसांची टीम एका आरोपीला पकडण्यासाठी निघाली होती. या टीममध्ये १५ ते १६ पोलीस अधिकारी होते. त्यातील तीन जण गणवेशात होते. रात्रीच्या वेळी प्रवास करताना पोलिसांनी गुगल मॅपचा वापर करायला सुरुवात केली. पुढे प्रवास करताना त्यांनी आसामची सीमा ओलांडली. त्यांनी नागालँडच्या सीमेमध्ये प्रवेश केला. दरम्यान गुगल मॅपवर ते अजूनही आसाममध्ये असल्याचे दाखवत होते.

पोलिसांची टीम रात्री नागालँडमध्ये पोहोचली. ते गणवेशात नव्हते, शिवाय त्यांच्याकडे अत्याधुनिक हत्यार देखील होते. तेव्हा स्थानिकांना त्यांच्यावर संशय आला. हे लोक बदमाश आहेत असा समज स्थानिक नागरिकांना झाला. त्यांनी पोलिसांना पकडून ठेवले. यात एक पोलीस कर्मचारी जखमी देखील झाला. रात्रभर आसाम पोलिसांना डाबवून ठेवण्यात आले.

स्थिती बिघडत असल्याचे पाहून आसाम पोलिसांनी नागालँडच्या स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांना संपर्क केला. त्यांनी नागालँड पोलिसांना सर्व प्रकार समजवला. त्यानंतर नागालँड पोलिसांनी एक टीम घटनास्थळी पाठवली. त्यानंतर त्यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधला आणि आसाम पोलिसांची सुटका केली. हा सर्व प्रकार गुगल मॅप वापरल्यामुळे झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : पुण्यात विसर्जनासाठी गेलेले ४ जणांचा पाण्यात बुडून मृत्यू

Ganesh visarjan 2025 : गणपतीचे विसर्जन करताना विपरीत घडलं, तीन तरुण पाण्यात वाहून गेले

Pune News: पुण्यात दगडूशेठ गणपतीची महाआरती पाहा VIDEO

ITR Filing : टॅक्स रिफंड परताव्याचा फॉर्म अडकून पडलाय? मग 'या' गोष्टी एकदा तपासाच

Akola Accident: गणेश विसर्जन करून परताना भक्तांवर काळाचा घाला; तरुणाचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT