India Cheapest Train Ticket : वंदेभारत-राजधानीला देते टक्कर, ६८ पैसे प्रतिकिमी खर्च, 'ही' आहे सर्वात कमी तिकीटदर असणारी एसी ट्रेन

Cheapest AC Train Ticket : भारतातील सर्वात कमी तिकीटदर असलेली एसी ट्रेन कोणती? या ट्रेनचं तिकीट किती आहे? ही ट्रेन खरंच वंदे भारत आणि राजधानी एक्स्प्रेसला टक्कर देते का? जाणून घ्या.
Indian railway
Indian railwaySaam Tv
Published On

India Cheapest Train Ticket : भारतीय रेल्वेमध्ये कोच आणि सुविधांच्या आधारे तिकीटाची किंमत ठरवली जाते. जनरल आणि स्लीपर कोचच्या तुलनेमध्ये रेल्वेच्या एसी कोचचे तिकीट जास्त असते. एसी ट्रेनमधील कोचची किंमत ही स्लीपर तिकीटच्या दुप्पट असते. तिकीटदरामुळे एसी कोचने प्रवास करणे बरेचसे लोक टाळतात. दरम्यान भारतीय रेल्वेमध्ये एक अशी ट्रेन आहे, ज्यात प्रवास फक्त प्रति किलोमीटरला फक्त ६८ पैसे खर्च येतो. या एसी ट्रेनचे नाव काय? जाणून घ्या..

वंदे भारत, नमो भारत, राजधानी या गाड्यांप्रमाणे या ट्रेनमध्ये ही एसीसह अन्य सुविधा आहेत. पण बाकी एक्स्प्रेस गाड्यांच्या तुलनेमध्ये या ट्रेनचे तिकीटदर कमी आहे. या ट्रेनमध्ये प्रवास करण्याचा खर्च प्रतिकिलोमीटर ६८ पैसे इतका आहे. प्रवाशांना कमी तिकीटदरात एयर कंडिशन ट्रेनमध्ये प्रवास करता यावा यासाठी ही ट्रेन सुरु करण्यात आली होती.

सर्वात कमी तिकीटदर असणाऱ्या ट्रेनचे नाव 'गरीब रथ एक्स्प्रेस' असे आहे. काहीजण या ट्रेनला गरीबांची राजधानी एक्स्प्रेस असेही म्हणतात. या एक्स्प्रेस ट्रेनचा पहिला प्रवास २००६ मध्ये सुरु झाला होता. बिहारच्या सहरसा ते अमृतसरपर्यंत ट्रेनचा प्रवास झाला होता. आज ही गाडी विविध शहरांच्या २६ मार्गांवर धावते. दिल्ली-मुंबई, दिल्ली-चेन्नई, पटना-कोलकाता अशा महत्त्वपूर्ण मार्गिकांवर या एक्स्प्रेस ट्रेनचा प्रवास सुरु असतो.

Indian railway
Mumbai Local Train : मध्य रेल्वेची गर्दी अशी कमी होणार, फक्त ही गोष्ट करायला हवी

चेन्नई ते हजरत निजामुद्दीन धावणाऱ्या गरीब रथ एक्स्प्रेसचे तिकीट १,५०० रुपये आहे. २०७५ लांब मार्गिकेवरील हा प्रवास करण्यासाठी २८-२९ तास लागतात. ही गरीब रथ एक्स्प्रेस ट्रेनची सर्वात लांब मार्गिका आहे. याच मार्गावर राजधानी एक्स्प्रेस सुद्धा धावते. राजधानी एक्स्प्रेसच्या थर्ड क्लास एसी कोचचे तिकीट ४,२१० इतके आहे. यावरुनच दोन्ही ट्रेनच्या तिकीटांच्या किंमतीमध्ये किती फरक आहे हे लक्षात येते. याच कारणामुळे गरीब रथ ट्रेनचे तिकीट सहज मिळत नाही.

Indian railway
Vande Bharat Express Train: वंदे भारतने प्रवास करायचाय? मग ट्रेनचे नियम माहिती आहेत का?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com