ISRO Gaganyaan mission flight test successful Saam TV
देश विदेश

Gaganyaan Mission Test: इस्त्रोच्या महत्वाकांक्षी मोहिमेची चाचणी यशस्वी; गगनयान अवकाशात झेपावलं

Gaganyaan Mission Test: भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्त्रोच्या महत्वकांक्षी मोहिमेची पहिली चाचणी यशस्वी झाली आहे.

Satish Daud

Gaganyaan Mission Test Successful

भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्त्रोच्या महत्वाकांक्षी मोहिमेची पहिली चाचणी यशस्वी झाली आहे. श्रीहरिकोटा येथून गगनयानचे पहिले चाचणी उड्डाण यशस्वीरीत्या प्रक्षेपित करण्यात आलं असून गगनयान 400 किलोमीटरपर्यंत अवकाशात झेपावलं आहे. या यशस्वी चाचणीमुळे भारतानं अवकाश मोहिमेत आणखी एक इतिहास रचला आहे. (Latest Marathi News)

चाचणी यशस्वी होताच इस्त्रोच्या वैज्ञानिकांनी एकमेकांचं अभिनंदन केलं आहे. दरम्यान, गगनयान मोहिमेदरम्यान अंतराळवीरांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी हे चाचणी उड्डाण करण्यात आलं आहे. या चाचणी दरम्यान मॉड्यूल अंतराळात नेलं जाईल. त्यानंतर ते ठराविक उंचीपर्यंत नेऊन पुन्हा पृथ्वीवर परत आणून बंगालच्या उपसागरात उतरवले जाईल.

इस्रोकडून या उड्डाण चाचणीला अबॉर्ट टेस्ट असं नाव देण्यात आलं आहे. गगनयान’ या भारताच्या मानवी अवकाश मोहिमेत अंतराळवीरांच्या सुरक्षेची खात्री ‘टीव्ही-डी१’मधील ‘क्रू मोड्यूल’द्वारे घेण्यात आली. या चाचणी उड्डाणाच्या यशामुळे उर्वरित चाचण्या आणि मानवरहित मोहिमांचा मार्ग मोकळा झाला आहे.

भारतीय अंतराळवीरांच्या पहिल्या गगनयान मोहिमेसाठी या चाचण्या महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. गगनयान मोहीम २०२५ मध्ये प्रत्यक्षात येण्याची अपेक्षा आहे. ‘टीव्ही-डी१’मध्ये सुधारित विकास इंजिनाचा समावेश केलेला असून त्याच्या पुढील भागात ‘क्रू मोड्यूल’ आणि ‘क्रू एस्केप सिस्टिम’ ही उपकरणे बसविण्यात आली आहेत. हे यान ३४.९  मीटर उंच आहे आणि त्याचे वजन ४४ टन आहे.

इस्त्रोच्या या गगनयानचं श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून आज लॉन्चिंग केलं जाणार होतं. यासाठी काउंडाऊन सुद्धा मात्र, खराब हवामान आणि काही तांत्रिक अडचणींमुळे काही मिनिटांसाठी लॉन्चिंग पुढे ढकलण्यात आलं. या तांत्रिक अडचणी दूर झाल्यानंतर गगनयानचं उड्डाण करण्यात आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अंत्यसंस्कारावरून परतताना बस अन् ट्रकचा भीषण अपघात; 22 जणांचा मृत्यू, पाहा काळीज पिळवून टाकणारा VIDEO

किचनमध्ये कोणत्या दिशेला RO लावावं? दिशा चुकली तर होईल दुर्दशा

140KM वेगाचं भयानक 'अर्णब' चक्रीवादळ घडवणार विध्वंस; किनारपट्टीवरील राज्यांना अलर्ट जारी

Maharashtra News Live Update: पुण्यात पाणीटंचाईची झळ! स्विमिंग पूल, वॉशिंग सेंटरसाठी लवकरच नियमावली

Spices Storage Tips: मसाले फ्रिजमध्ये ठेवावेत की बाहेर? जास्त काळ फ्रेश आणि सुगंधी ठेवण्याची योग्य पद्धत जाणून घ्या!

SCROLL FOR NEXT