Lalit Patil Case Update: ललित पाटीलला मेफेड्रॉन तयार करण्याचा फॉर्म्युला कुणी दिला? पोलिसांनी अखेर छडा लावलाच, आरोपी गजाआड

Lalit Patil News: पुढे ललितने हा फॉर्म्युला भाऊ भूषणला दिला. त्यानंतर दोघांनी मिळून नाशिकमध्ये मेफेड्रॉनचा कारखाना सुरू केला, अशी माहिती पोलिसांनी दिलीये.
Lalit Patil Case Update
Lalit Patil Case UpdateSaam TV
Published On

Pune Crime News:

ललित पाटील सध्या पुणे पोलिसांच्या ताब्यात आहे. अंमली पदार्थांप्रकरणी पोलीस तपासात रोज नवनवीन माहिती समोर येतेय. अशात ललितला अंमली पदार्थ बनवण्याचा फॉर्म्युला नेमका कोणी दिला याबाबत माहिती समोर आलीये.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Lalit Patil Case Update
Lalit Patil Case: ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात मोठी अपडेट; पोलीस चौकशीत चक्रावून टाकणारी माहिती समोर

केमिकल इंजिनिअर अरविंदकुमार प्रकाशचंद्र लोहारे याने ललित पाटीलला मेफेड्रॉन (एमडी)तयार कसे करायचे याचा फॉर्म्युला दिला. पुढे ललितने हा फॉर्म्युला भाऊ भूषणला दिला. त्यानंतर दोघांनी मिळून नाशिकमध्ये मेफेड्रॉनचा कारखाना सुरू केला, अशी माहिती पोलिसांनी दिलीये.

मिळालेल्या अधिक माहितीनुरसार, येरवडा कारागृहातच हा फॉर्म्युला तयार करण्याची माहिती ललितला अरविंदकुमारने दिली होती. यातूनच ललितने अंमली पदार्थ तस्करीचे साम्राज्य निर्माण केल्याचं पोलिसांनी न्यायालयात म्हटलंय.

चाकण येथे अंमली पदार्थ विक्रीप्रकरणी ललितला अटक करण्यात आली होती. त्यानंतर ललित आणि अरविंदकुमार दोघेही येरवडा कारागृहात भेटले. त्यावेळी या दोघांमध्ये बातचीत व्हायची. याच दरम्यान ललितला मेफेड्रॉन तयार करण्याचा फॉर्म्युला देण्यात आला.

अरविंदकुमार प्रकाशचंद्र लोहारे सध्या कुठे आहे?

अरविंदकुमार प्रकाशचंद्र लोहारे सध्या येरवडा कारागृहातच आहे. पोलीस त्याचीही कसून चौकशी करतायत.

ललित पाटील अंमली पदार्थांप्रकरणी नाशिक पोलिसांचा तपासही सुरू आहे. नाशिकचा सराफ व्यावसायिक सध्या पोलिसांच्या रडारवर आहे. ललितने अंमली पदार्थांप्रकरणी व्यवसायात बक्कळ पैसे कमवले होते. यातील काही रकमेचे त्याने सोने खरेदी केल्याची माहिती मिळाली आहे.

ललितचा भाऊ भूषणने नाशिकमधून तब्बल ८ किलो सोनं विकत घेतलं होतं. त्यापैकी ३ किलो सोनं हस्तगत करण्यास पोलिसांना यश आलंय. तर उर्वरित सोनं कुठे लपवलंय याचा पोलीस शोध घेतायत.

Lalit Patil Case Update
Crime News : व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत बँक मॅनेजरला मागितली अडीच लाखांची खंडणी, महिलेसह एकास अटक

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com