ड्रग्स माफिया ललित पाटील याला अटक केल्यानंतर आता पोलिसांनी त्याची कसून चौकशी सुरू केली आहे. या चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. त्यामुळे या प्रकरणात अनेक बडे मासे गोत्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, ललित पाटील याने पोलीस चौकशीत आणखी एक मोठा खुलासा केला आहे. (Latest Marathi News)
२०२१ पासून नाशिकच्या शिंदे गावात एमडीचं उत्पादन सुरू होतं. दर महिन्याला या ठिकाणाहून ५० किलो एमडीची निर्मिती केली जात होती. या एमडीचा सप्लाय मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि नाशिकसह राज्यातील अन्य शहरांमध्ये केला जात होता, असं पोलीस चौकशीत समोर आलं आहे.
ड्रग पेडलर्सच्या नेटवर्कच्या मदतीने हा एमडीचा पुरवठा होत होता. यातून ललित पाटील आणि त्याचा भाऊ भूषण पाटील दर महिन्याला तब्बल ५० लाख रुपयांचा नफा कमावत होते, असं पोलीस चौकशीत समोर आलं आहे. दरम्यान, पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणात १६ आरोपींना अटक केली आहे. आणखी काहीजण पोलिसांच्या रडारवर आहेत.
ललित पाटील याच पैशाच्या जोरावर हॉस्पिटलमधील कर्मचारी आणि पोलिसांना मॅनेज करत असल्याचं त्याच्या चौकशीतून उघड झालं आहे. ससूनमधील मुक्काम वाढवण्यासाठी डॉक्टर आणि पोलिसांना तो सातत्याने पैसे देत होता. ललित पाटील ससून रुग्णालयातून ड्रग्ज सिंडिकेट चालवत होता आणि ससूनच्या बाहेर जाऊन बैठका घ्यायचा, अशी माहितीही ललितने पोलिसांना दिल्याचं सूत्रांनी सांगितलं.
ललित पाटील ड्रग्ज प्रकरणावरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणात सरकारमधील दोन मंत्र्यांचा हात असल्याचा आरोप शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. नेमक्या याच विषयावर गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती साम टीव्हीला सूत्रांनी दिली आहे. आज देवेंद्र फडणवीस याबाबत पत्रकारपरिषद घेणार असून मोठा खुलासा करण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.