त्रिपुरा सरकारने सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी मोठा निर्णय घेतला
महागाई भत्ता आणि महागाई सवलतमध्ये ३ टक्के वाढ करण्यात आली
या वाढीनंतर महागाई भत्त्याचा एकूण दर ४४ टक्के झाला आहे
सुधारित महागाई भत्ता आणि महागाई सवलत १ ऑक्टोबर २०२६ पासून लागू होणार
दसरा आणि दिवाळीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांसााठी आनंदाची बातमी आहे. त्रिपुरा राज्यातील सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी सरकारने मोठा निर्णय घेतला. राज्य सरकारने महागाई भत्ता आणि महागाई सवलतमध्ये ३ टक्क्यांनी वाढ जाहीर केली. महत्वाचे म्हणजे, सरकारी कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्त्यामध्येही बदल करण्यात आला आहे. हे नवीन दर १ ऑक्टोबर २०२६ पासून लागू होणार आहेत.
त्रिपुरा मंत्रिमंडळाने ६ ऑक्टोबर रोजी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला. सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात आणि निवृत्तीवेतनधारकांच्या महागाई सवलतीत ३ टक्के वाढीस त्रिपुरा सरकारने मंजुरी दिली. या वाढीनंतर राज्य कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना ४४ टक्के दराने महागाई भत्ता आणि महागाई सवलत मिळणार आहे. मुख्यमंत्री माणिक साहा आणि अर्थमंत्री प्रणजीत सिंग रॉय यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ही घोषणा केली.
महागाई भत्ता आणि महागाई सवलतीचे नवीन दर १ ऑक्टोबर २०२६ पासून लागू होतील, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. या निर्णयामुळे राज्याच्या तिजोरीवर दरवर्षी अंदाजे ३०० कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे. मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले की, आर्थिक आव्हाने असूनही सरकार कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांच्या कल्याणासाठी मोठी पावले उचलत आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना ऑक्टोबरचा पगार आणि निवृत्ती वेतनधारकांना पेंशन वाढून मिळणार आहे.
मंत्रिमंडळाच्या बैठकीत महागाई भत्त्यातील वाढीसोबतच त्रिपुरा सरकारने घरभाडे भत्त्याबाबत देखील एक मोठा निर्णय घेतला. घरभाडे भत्त्यात २ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. ज्या कर्मचाऱ्यांना पूर्वी त्यांच्या मूळ वेतनाच्या ८ टक्के घरभाडे भत्ता मिळत होता त्यांना आता त्यांच्या मूळ वेतनाच्या १० टक्के घरभाडे भत्ता मिळणार आहे. म्हणजे, ३०,००० रुपये मूळ वेतन असलेल्या कर्मचाऱ्याला आता ३,००० रुपये घरभाडे भत्ता मिळेल. आतापर्यंत त्यांना २,४०० रुपये घरभाडे भत्ता मिळत होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.