Gold-Silver Price Today Saam Tv
देश विदेश

Gold-Silver Price Today : अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोन्या-चांदीचे भाव घसरले ! जाणून घ्या 10 ग्रॅम सोन्याचा आजचा दर

Akshaya Tritiya Gold Silver Rate In Maharashtra: उद्या पुन्हा सोन्याचे भाव वाढणार का ? आजचं सोने खरेदी करायचे का ?

कोमल दामुद्रे

Sona Chandi Bhav : सराफ बाजाराच्या आठवड्याचा आजचा शेवटचा दिवस. यंदाच्या आठवड्यात सोन्यात बरीच घसरण पाहायला मिळाली परंतु, काल पुन्हा सोन्याचे दर वाढले. उद्या असणाऱ्या अक्षय्य तृतीया व ईदसारख्या शुभ मुहूर्तावर ग्राहकांचा सोने खरेदी करण्याकडे अधिक कल असेल.

गेल्या वर्षीच्या तुलनेत सोन्याच्या (Gold) भावात वाढ पाहायला मिळत आहे. उद्या पुन्हा सोन्याचे भाव वाढणार का ? हा प्रश्न ग्राहकांना पडतो आहे. आजचं सोने खरेदी करायचे का हा देखील प्रश्न त्यांच्या समोर आहे.

गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार 22 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याची किंमत 55,850 रुपये तर 24 कॅरेट साठी 60,930 रुपये आहे तर आज 10 ग्रॅम चांदी 774 रूपये आहे. (Gold Silver Price update 21st April 2023)

1. तुमच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या

चेन्नई - 61,640रुपये

दिल्ली - 61,080 रुपये

हैदराबाद - 60,930 रुपये

कोलकत्ता - 60,930 रुपये

लखनऊ - 61,080 रुपये

मुंबई (Mumbai) - 60,930 रुपये

नागपूर - 60,930 रुपये

पुणे (Pune) - 60,930 रुपये

2. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने खरेदी करणे शुभ मानले जाते

शनिवारी 22 एप्रिल रोजी अक्षय्य तृतीया साजरी होणार आहे. अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करणे शुभ मानले जाते कारण यामुळे तुमच्या घरात शांती आणि समृद्धी येते. असे मानले जाते की जर तुम्ही या दिवशी कोणतीही खरेदी केली तर त्याचे मूल्य वाढते आणि ते नेहमी तुमच्यासोबत राहते, कधीही कमी होत नाही आणि वेळेनुसार वाढते. म्हणूनच या दिवशी बरेच लोक प्रॉपर्टी आणि स्टॉकमध्ये गुंतवणूक करतात.

3. हॉलमार्कचे (Hallmark)सोनं कसे खरेदी कराल?

सोनं खरेदी करताना आपण त्याची गुणवत्ता तपासायला हवी. हॉलमार्कचे चिन्ह असल्यावरच ते खरेदी करा. यामध्ये याची हमी सरकार आपल्याला देते. ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vinesh Phogat: आम्ही तेव्हाच सेफ राहू जेव्हा तुमचे नेते महिला अत्याचार थांबवतील, विनेश फोगाट यांचा भाजपवर निशाणा

Washim Vidhan Sabha : वाशिम विधानसभा मतदारसंघात बंडखोर उमेदवाराचा भाजपात प्रवेश; महायुतीला होणार फायदा

Ajit Pawar Speech : अजित पवारांनी जाहीर कबुल केलं; बारामतीकरांसमोर चूक मान्य करत म्हणाले...VIDEO

Maharashtra Assembly Election 2024: सावधान! मतदानासंदर्भात दिशाभूल करणारे संदेश पाठवाल तर होईल कडक कारवाई

IPL 2024 Mega Auction: IPL स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात महागडे खेळाडू

SCROLL FOR NEXT