Delhi Crime News Saam Tv
देश विदेश

Delhi Girl Killed Case: प्रेमाचा भयानक शेवट! गर्लफ्रेंड घराबाहेर पडताच बॉयफ्रेंडने केलं भयानक कृत्य; खळबळजनक घटनेने दिल्ली हादरली

Delhi Crime News: ही घटना सीसीटीव्हीत (CCTV) कैद झाली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

Priya More

Delhi News: दिल्लीमध्ये 16 वर्षांच्या मुलीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या (Delhi Girl Killed Case) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रविवारी संध्याकाळी दिल्लीच्या शाहबाद डेअरी परिसरात ही घटना घडली. ही घटना सीसीटीव्हीत (CCTV) कैद झाली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीच्या शाहबाद डेअरी परिसरात ही घटना घडली. आरोपी साहिलने साक्षीला वाटेत अडवले आणि तिच्यावर चाकूने 40 वेळा वार केले. आरोपी ऐवढ्यावरच थांबला नाही त्यानंतर त्याने साक्षीच्या डोक्यावर दगड टाकून तिची निर्घृण हत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

पोलिसांनी सांगितले की, 'साक्षी आणि आरोपी साहिल दोघेही रिलेशनशिपमध्ये होते. मात्र शनिवारी दोघांमध्ये काही कारणावरून भांडण झाले. याचाच राग मनात ठेवून आरोपीने हे कांड केलं. साक्षीवर किती वेळा वार केले हे शवविच्छेदनानंतर कळेल.' साक्षी दिल्लीच्या ई-36 जेजे कॉलनीमध्ये कुटुंबीयांसोबत राहत होती. तिच्या हत्येमुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.

साक्षी रविवारी संध्याकाळी आपल्या मैत्रिणीच्या वाढदिवसाला जाण्यासाठी घराबाहेर पडली. त्यावेळी साहिलने तिला रस्त्यामध्ये अडवले. दोघांमध्ये सुरुवातीला बाचाबाची झाली. त्यानंतर साहिलने सोबत आणलेल्या चाकूने साक्षीवर सपासप वार केले. साक्षी जोरजोरात ओरडत होती तरी साहिल तिच्यावर वार करतच राहिला. रस्त्यावरुन जाणारे सर्वजण पाहत होते पण कोणीच त्याला अडवण्याचा प्रयत्न केला नाही. साहिल ऐवढ्यावर थांबला नाही तर त्याने साक्षीच्या डोक्यावर सहा वेळा दगडाने वार केले.

साक्षीवर हल्ला केल्यानंतर आरोपी साहिलने घटनास्थळावरुन पळ काढला. रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेल्या साक्षीला जखमी अवस्थेत तात्काळ नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. याप्रकरणी आरोपी साहिलविरोधात दिल्लीच्या शाहबाद डेअरी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस फरार साहिलचा शोध घेत आहेत. या प्रकरणाची दखल दिल्लीच्या महिला आयोगाने घेतली आहे. त्यांनी आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Golden Man Crime : पुण्यासारखं पनवेलमध्येही गँगवॉर, गोल्डमॅन अन् म्हात्रे भिडले, १४ आरोपींवर गुन्हा, वाचा नेमकं प्रकरण

Ladki Bahin Yojana: लाडकीसाठी खुशखबर, ऑगस्टचे ₹१५०० खात्यात खटाखट येणार, सरकारने उचलले मोठं पाऊल

Maharashtra Live News Update : नागपूर विभागात पाच भागात असणार वीजपुरवठा बंद

Lalbaugcha Raja: मुंबईतील लालबागचा राजा मंडळात गरबा होणार; गणेश मंडळ उद्योगपतींकडून हॅकजॅक, मनसेचा आरोप

Thane crime : ठाण्यात गुंडांची दहशत, प्रसिद्ध डॉक्टरांच्या दवाखान्याची तोडफोड, व्हिडिओ समोर

SCROLL FOR NEXT