UP Crime News: संपत्तीसाठी मुलाचे क्रूर कृत्य! जन्मदात्या आई वडिलांची निर्घृण हत्या; भररस्त्यात...

Uttar Pradesh Crime: पती पत्नी गाडीवरुन जात असतानाच पाठीमागून येत मुलाने अंधाधूंद गोळीबार सुरू केला, यामध्ये दोघांचाही दुर्देवी मृत्यू झाला....
Uttar Pradesh Crime
Uttar Pradesh CrimeSaamtv

Firozabad Crime News: उत्तरप्रदेशमधील फिरोजाबादमध्ये एक धक्कादायक आणि तितकीच हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. शहरात प्रॉपर्टीच्या वादातून मुलानेच आपल्या जन्मदात्या आई वडिलांची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे. या भयंकर घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हत्येनंतर तरुण फरार झाला असून पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत..

Uttar Pradesh Crime
Dhule Accident News: पायी जाणाऱ्या इंजिनीअर तरुणाला वाहनाची धडक; एकुलता एक मुलगा गेल्याने कुटुंबाचा आक्रोश

याबाबत अधिक माहिती अशी की, राकेश सिंह आणि गुड्डी देवी अशी हत्या करण्यात आलेल्या दांपत्याचं नाव आहे. दोघेही गाडीवरुन रामिया येथून एटा येथील त्यांच्या लहान मुलाच्या घरी जात होते. याचवेळी पाठीमागून येवून त्यांच्या योगेश नावाच्या थोरल्या मुलाने अंधाधूंद गोळीबार केला. ज्यामध्ये त्यात राकेश आणि त्यांची पत्नी गुड्डी यांचा जागीच मृत्यू झाला.

ऐन रहदारीच्या रस्त्यावर हा हल्ला झाल्याने एकच खळबळ उडाली. लोक सैरावैरा पळू लागली. हल्लेखोर पळून गेल्यानंतर राकेश आणिु गुड्डी यांच्या मृतदेहाभोवती लोकांनी घोळका केला. पोलिसांना यासंदर्भातील माहिती कळवण्यात आली. (Latest Marathi News)

Uttar Pradesh Crime
Vaibhav Naik VS Nitesh Rane : "ईडीच्या भीतीने नारायण राणे भाजपमध्ये" नाईक आणि राणे यांच्यात जुंपली!

पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. तपासानंतर एसपी ग्रामीण रणविजय सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, घरात प्रॉपर्टीचा वाद होता. मयत दाम्पत्य त्यांच्या लहान मुलासोबत एटा येथे राहत होते.

याच प्रॉपर्टीच्या वादातून मोठा मुलगा योगेशने गोळ्या झाडून आई-वडिलांची हत्या केली. गुन्हा केल्यानंतर आरोपी योगेश घटनास्थळावरून पळून गेला. पोलिस आता या घटनेचा अधिक तपास करत आहेत. (Crime News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com