Ghaziabad Tragedy Saam Tv News
देश विदेश

बहीण-भावाची आत्महत्या, आयुष्य संपवताना डायरीत सगळं लिहून ठेवलं, सावत्र आई - बापावर आरोप

Sister Blames Stepmother: गाझियाबादमधील आयबी अधिकारी आणि त्याच्या बहिणीने आत्महत्या केली असून, प्रकरणात भावनिक गुंतागुंत समोर आली आहे.

Bhagyashree Kamble

  • आयबी अधिकारी आणि त्याच्या बहिणीने आत्महत्या केली असून, प्रकरणात भावनिक गुंतागुंत समोर आली आहे.

  • अंजलीच्या डायरीत तिनं वडील, सावत्र आई आणि काही नातेवाईकांवर गंभीर आरोप केले आहेत.

  • ‘कधीच समजून घेतलं नाही’ अशा शब्दांत तिनं तिच्या भावनांची नोंद केली आहे.

  • पोलीस सध्या डायरीतील मजकूर, पोस्टमॉर्टम रिपोर्ट आणि तक्रारीच्या आधारे सखोल तपास करत आहेत.

गाझियाबादमधील गोविंदपुरम येथे आयबी कर्मचारी अविनाश आणि त्याच्या बहिणीनं राहत्या घरात आयुष्य संपवलं. या प्रकरणात मोठा ट्विस्ट समोर आला आहे. पोलिसांना तपासादरम्यान, एक डायरीचं पान सापडलं आहे. यात अजंलीनं 'वडील आणि सावत्र आई कधीच समजू शकले नाहीत', असं लिहिलं आहे. तिनं नातेवाईकांवरही गंभीर आरोप केले आहेत. सध्या गाझियाबाद पोलीस डायरीतील पाने, पोस्टमॉर्टम रिपोर्ट आणि मिळालेल्या तक्रारीच्या आधारे या प्रकरणाचा तपास करीत आहे.

अंजलीनं आपल्या डायरीमध्ये आयुष्यातील वेदना लिहून ठेवल्या आहेत. तिनं यातून सावत्र आई, वडील आणि इतर नातेवाईकांबाबात राग व्यक्त केला आहे. अंजलीनं तिच्या आत्महत्यासाठी तिचे वडील आणि सावत्र आईला थेट जबाबदार धरले आहे.

डायरीत अंजलीनं लिहिलं की, वडिलांसारखं कधीही ते काही वागले किंवा बोलले नाही, असं अंजली म्हणाली. तिनं त्यात सावत्र आई आणि वडिलांकडून होणाऱ्या मानसिक छळाबाबतही सांगितले. तसेच इतर नातेवाईकांबाबत नाराजी व्यक्त केली. 'आमची काळजी घेणं अपेक्षित होतं. पण त्यावेळेस आम्हाला एकटे सोडले', असा आरोप तिनं मामा आणि काकींवर केला.

अंजलीनं तिच्या डायरीत लिहिले की, 'भाऊ अविनाश आई वडिलांच्या इच्छा पूर्ण करण्यात व्यस्त होता. तो कधीही मित्रांसोबत पिकनिकला गेलेला नाही. त्याला कठोर परिश्रमानं सरकारी नोकरी मिळाली. पण आजही घरी समाधान नाही'.

दरम्यान, पोलिसांकडून अंजलीच्या डायरीच्या चौकशी केली जात आहे. मिळालेल्या तक्रारी आणि पोस्टमॉर्टम रिपोर्टच्या आधारे पोलीस अधिक तपास करतील. सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यातील खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठा गतवर्षीपेक्षा १.२१ टीएमसीने कमी

Health Care : ठसका लागला की वरती बघायला का सांगतात ? कारण ऐकून तुम्ही सुद्धा चक्रवाल

Maharashtra Rain Alert: पाऊस धुमाकूळ घालणार! पश्चिम महाराष्ट्र अन् मराठवाड्यात तुफान पावसाचा अंदाज, कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

Dhule Firing: गोळीबाराने धुळे हादरले; राजकमल टॉकीज परिसरात पोलिसांची नाकाबंदी

Bank Strike Postponed: दिलासादायक बातमी! ३ दिवसांचा देशव्यापी बँक संप पुढे ढकलला; IBA आणि बँक संघटनेच्या बैठकीत काय घडलं?

SCROLL FOR NEXT