नांदेडच्या लॉजमध्ये आढळला शिक्षकाचा मृतदेह; हत्या ती आत्महत्या? नक्की घडलं काय?

Suspicious Death of Teacher: नांदेडच्या महादेव पिंपळगाव येथील लॉजमध्ये शिक्षकाचा मृतदेह आढळल्याने खळबळ. मृत शिक्षक आशिष शिंदे हे खासगी शिक्षण संस्थेत कार्यरत होते.
Shocking Incident
Shocking IncidentSaam Tv news
Published On
Summary
  • नांदेडच्या महादेव पिंपळगाव येथील लॉजमध्ये शिक्षकाचा मृतदेह आढळल्याने खळबळ.

  • मृत शिक्षक आशिष शिंदे हे खासगी शिक्षण संस्थेत कार्यरत होते.

  • पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

  • आत्महत्या की हत्या? – याचा तपास अर्धापूर पोलीस करत आहेत.

नांदेडमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. लॉजमध्ये एका शिक्षकाचा मृतदेह आढळल्यानंतर खळबळ उडाली आहे. महादेव पिंपळगाव येथील लॉजमधून हा सर्व प्रकार उघडकीस आला. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवले. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

आशिष शिंदे असे मृत शिक्षकाचे नाव आहे. ते नांदेड येथील रहिवासी होते. कंधार तालुक्यातील एका खासगी शिक्षण संस्थेत ते शिक्षक होते. त्यांचा मृतदेह परिसरातील लॉजमध्ये संशयास्पद स्थितीत आढळला. नांदेडपासून जवळच असलेल्या महादेव पिंपळगाव येथील लॉजमध्ये हा सगळा प्रकार घडला आहे.

Shocking Incident
सोनं की SIP; सर्वाधिक परतावा कुठे? १५ वर्षे दरमहा ₹५,००० रूपये गुंतवा अन्..., वाचा कॅल्क्युलेशन

या प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच शिंदे यांचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवले. अर्धापूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, घटनेचा अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे.

दरम्यान, त्यांनी आत्महत्या केली की हत्या? त्यांचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला? त्यांच्या मृत्यूमागचं नेमकं कारण काय? शिंदे लॉजवर नेमकं कोणत्या कारणासाठी गेले होते? याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Shocking Incident
ना पाणी - ना जेवण, फक्त बिअर, बायकोसोबत डिव्होर्स अन् दुरावा सहन झाला नाही; शेवट झाला भयानक

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com