सोनं की SIP; सर्वाधिक परतावा कुठे? १५ वर्षे दरमहा ₹५,००० रूपये गुंतवा अन्..., वाचा कॅल्क्युलेशन

SIP vs Gold: १५ वर्षांकरता दरमहा ₹5000 गुंतविल्यास SIP सुमारे ₹4.3 लाख अधिक परतावा देते, पण बाजाराशी संबंधित असते. सोनं स्थिर असलं तरी परतावा तुलनेत कमी असतो.
SIP vs Gold
SIP vs GoldSaam Tv News
Published On

आजच्या काळात बचतीसाठी आणि गुंतवणुकीसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. पगारातून काही रक्कम बाजूला काढून नियमित बचत करणे ही सवय चांगल्या आर्थिक आरोग्यासाठी आवश्यक आहे. दरमहा ₹५,००० गुंतवायचे ठरवले, तर आपल्यापुढे सोनं, म्युच्युअल फंड, SIP, फिक्स्ड डिपॉझिट अशा विविध पर्यायांची रांग लागते. पण प्रश्न असा निर्माण होतो की, सुरक्षित आणि जास्त परतावा देणारा खरा पर्याय कोणता? जाणून घेऊयात.

प्रत्येक व्यक्तीची गुंतवणूक उद्दिष्टे वेगवेगळी आहेत. काही लोकांना सुरक्षितता हवी असते, तर काही अधिक परताव्यासाठी जोखीम घेण्यास तयार असतात. पण जर १५ वर्षांसाठी ५हजार नेमकं कुठे गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल? याची माहिती घेऊयात.

म्युच्युल फंड एसआयपी

सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (एसआयपी) ही एक पद्धत आहे, ज्यामध्ये आपण दरमहा म्युच्युल फंडात निश्चित रक्कम गुंतवतो. ही स्कीम त्या लोकांसाठी चांगली आहे, जे दीर्घ काळावधीसाठी गुंतवणूक करू इच्छितात आणि थोडी जोखीम घेऊ शकतात. एसआयपीमध्ये गुंतवणूक करण्याचा फायदा असा की, चक्रवाढ मिळते. म्हणजेच मिळालेला परतावा पुन्हा गुंतवला जातो. कालांतरानं एक मोठा निधी तयार होतो.

SIP vs Gold
ठाकरेंचा भाजपला जोरदार धक्का; यवतमाळमधील २ बड्या नेत्यांनी मशाल घेतली हाती

एसआयपी हे मार्केटशी संबंधित आहे. यामुळे परताव्याची कोणतीही हमी नाही. पण वार्षिक १२ टक्केपर्यंत परतावा मिळणे शक्य आहे.

सोनं

सोने ही भारतीय गुंतवणूकदारांची पहिली पसंती आहे. हा एक पारंपारिक आणि सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय आहे. ज्यांना मार्केटमधील चढ उतार टाळायचे असतील सोनं हा एक विश्वासार्ह पर्याय आहे. गेल्या काही वर्षात सोन्यानेही चांगला परतावा दिला आहे. दरवर्षी सरासरी १० टक्के पर्यंत वाढ दिसून आली आहे. सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी सॉवरेन गोल्ड बाँड, गोल्ड ईटीएफ आणि डिजिटल गोल्डसारखे डिजिटल पर्याय देखील उपलब्ध आहेत.

SIP vs Gold
बातमी लावल्याचा राग! संपादकासह पत्रकारांवर प्राणघातक हल्ला, कोयत्यानं सपासप वार | Akola Crime

आता आपण समजून घेऊयात, १५ वर्षांसाठी दरमहा ५००० गुंतवले तर, दोन्ही पर्यायांमध्ये काय फरक असेल:

म्युच्युअल फंड एसआयपी

गुंतवणूक रक्कम : ५००० प्रति महिना.

एकूण कार्यकाळ : १५ वर्षे.

एकूण गुंतवणूक : ९ लाख.

अंदाजे परतावा : १२ टक्के वार्षिक.

एकूण परतावा : १६,२२,८७९

एकूण निधी मूल्य : २५,२२,८७९

सोनं

गुंतवणूक रक्कम : ५००० प्रति महिना.

एकूण कार्यकाळ : १५ वर्षे.

एकूण गुंतवणूक : ९ लाख.

अंदाजे परतावा : १० टक्के वार्षिक

एकूण परतावा : ११,८९,६२१

एकूण निधी मूल्य : २०,८९,६२१

या तुलनेतून हे स्पष्ट होते की, एसआयपीमध्ये गुंतवणूक करून तुम्ही सुमारे ४.३३ लाख अधिक मिळवू शकता. परंतु, ते पूर्णपणे मार्केट बाजारातील हालचालींवर अवलंबून असते. त्याच वेळी सोन्यातील परतावा कमी असूनही जोखीम देखील कमी आहे.

कोणता पर्याय निवडायचा?

तुम्ही कशात गुंतवणूक करावी हे तुमच्या जोखीम घेण्याची क्षमता आणि उद्दीष्टांवर अवलंबून असते. जर तुम्हाला कमी जोखीम घेऊन दीर्घकाळात जास्त पैसे कमवायचे असतील तर, एसआयपी उत्तम पर्याय आहे. परंतु, जर तुम्हाला स्थिरता आणि सुरक्षितता हवी असेल तर, सोनं अधिक योग्य असू शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com