ना पाणी - ना जेवण, फक्त बिअर, बायकोसोबत डिव्होर्स अन् दुरावा सहन झाला नाही; शेवट झाला भयानक

Man Consumes Only Beer for a Month: थायलंडमधील ४४ वर्षीय थावीसाक नामवोंगसा यांचा मानसिक तणावामुळे मृत्यू. बायकोपासून विभक्त झाल्यानंतर त्यांनी संपूर्ण महिनाभर फक्त बिअर पिऊन दिवस घालवले होते.
Man Consumes Only Beer for a Month
Man Consumes Only Beer for a MonthSaam Tv News
Published On
Summary
  • थायलंडमधील ४४ वर्षीय थावीसाक नामवोंगसा यांचा मानसिक तणावामुळे मृत्यू.

  • बायकोपासून विभक्त झाल्यानंतर त्यांनी संपूर्ण महिनाभर फक्त बिअर पिऊन दिवस घालवले.

  • मुलाने अनेकदा खाण्यासाठी सांगितले, पण त्यांनी काही खाल्ले नाही.

  • व्यसन आणि मानसिक तणावामुळे मृत्यू; परिसरात खळबळ उडाली.

जेव्हा नातं तुटतं, तेव्हा आवाज येत नाही, पण ती व्यक्ती आतून पुर्णपणे तुटते. खचून जाते. थायलंडमधील एका पुरूषासोबतही असाच प्रकार घडला. घटस्फोटामुळे अस्वस्थ झालेल्या व्यक्तीनं महिनाभर फक्त बिअर प्यायली. ना तो काही खात होता, ना पाणी पित होता. बायकोचा विरह त्याला सहन झाला नाही. व्यसन आणि मानसिक तणावामुळे त्याचा मृत्यू झाला. या दुर्देवी घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

थावीसाक नामवोंगसा (वय वर्ष ४४) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तो थायलंडच्या रायोंग प्रांतातील रहिवासी असल्याची माहिती आहे. महिनाभरापूर्वी त्यानं बायकोला काडीमोड दिला होता. मात्र, बायकोसोबत विभक्त झाल्यानंतर त्याला विरह सहन झाला नाही. त्यानं संपूर्ण महिना बिअर पिऊन घालवला. न काही खाता, न काही पिता त्यानं दिवस पुढे ढकळले.

Man Consumes Only Beer for a Month
ठाकरेंचा भाजपला जोरदार धक्का; यवतमाळमधील २ बड्या नेत्यांनी मशाल घेतली हाती

स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, १६ जुलै रोजी थावीसाक यांच्या घरी रूग्णवाहिकेला बोलावण्यात आले. ते घरी बेशुद्ध अवस्थेत पडले होते. त्यांना झटके आणि संपूर्ण अंग थरथरत होते. त्यांचे हात - पाय काळेनिळे पडले होते. जे रक्ताभिसरण बंद झाल्याचे लक्षण होते. डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. पोलिसांनी त्यांच्या खोलीची तपासणी केली असता, त्यांच्या घरात शेकडो रिकाम्या बिअरच्या बाटल्या आढळल्या.

Man Consumes Only Beer for a Month
अंगावर लघवी अन् प्रायव्हेट पार्टवर काठीनं मारलं, बिल्डरचा २ तास छळ; नेमकं प्रकरण काय?

थावीसाकच्या १६ वर्षीय मुलानं सांगितले की, वडिलांनी एक महिन्यांपासून काहीही खाल्ले नव्हते. फक्त बिअर पित होते. मुलानं अनेकवेळा त्यांना खायला देण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी खाल्लं नाही. त्यांना कोणताही आजार नव्हता, पण आईपासून वेगळं झाल्यापासून त्यांना या गोष्टीचा त्रास झाला. व्यसन आणि मानसिक तणावामुळे त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com