Vyomika Singh Saam
देश विदेश

Vyomika Singh: 'डॅडी, मम्मीला सांगू नका, ती हवाई दलात पाठवणार नाही'; विंग कमांडर व्योमिका सिंग यांचा संघर्षमय प्रवास

Meet Wing Commander Vyomika Singh: लहान वयापासूनच मोठ्या स्वप्नांची जिद्द मनात ठेवून विंग कमांडर व्योमिक सिंग यांनी आपला मार्ग शोधला. सैन्यात भरती होण्याची तिची इच्छा खूप प्रबळ होती. तिने जिद्दीने आपलं स्वप्न पूर्ण केलं.

Bhagyashree Kamble

ऑपरेशन सिंदूरनंतर दोन मुख्य नावं प्रकाशझोतात आली, भारतीय लष्कराच्या कर्नल सोफिया कुरेशी आणि भारतीय वायुसेनेच्या विंग कमांडर व्योमिका सिंग. या दोन्ही महिलांमुळे ऑपरेशन सिंदूर फत्ते झालं आणि पाकड्यांना सडेतोड उत्तर देण्यात आलं. व्योमिका सिंग सध्या चर्चेत आहे. त्यांचं आदर्श डोळ्यांसमोर ठेवून अनेकांनी आता वायुसेनेत पायलट बनण्याची इच्छा व्यक्त केली. पण व्योमिका सिंह यांचा संघर्षांचा प्रवास सोपा नव्हता. आई वडिलांकडून विरोध ते यशस्वी विंग कमांडर, त्यांचा प्रवास नेमका कसा होता? जाणून घेऊयात.

हवाई दलाच्या विंग कमांडर व्योमिका सिंग यांचा जन्म उत्तर प्रदेशच्या लखनऊ येथे झाला. व्योमिक सिंगचे वडील भारतीय हवाई दलात पायलट होते. त्यांचे संपूर्ण कुटुंब देशसेवेत कार्यरत आहेत. व्योमिका सिंग यांनी केलेल्या कार्याबद्दल त्यांच्या आई वडिलांना कौतुक आहे.

आज तक या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत, व्योमिका सिंह यांचे वडील सांगतात, 'जेव्हा माझी लेक दहावीत होती, तेव्हापासून तिने पायलट बनण्याचं स्वप्न उरी बाळगलं होतं. सुरूवातीला आम्ही आमच्या मुलीला अडवलं. मात्र, जिद्दीने तिने आपलं स्वप्न पूर्ण केलं आणि ती आता ते स्वप्न जगत आहे'.

आईच्या आठवणींमध्ये व्योमिका लहानपणापासूनच वेगळी होती. 'ती नेहमी खेळ, स्पर्धा यात भाग घ्यायची. एकदा तर खेळात भाग घेऊन मुलांना चितपट करत तिने २०,८०० रुपयांचं बक्षीस मिळवलं होतं,' असं आईनं सांगितलं.

व्योमिकाचे वडील सांगतात, लहानपणी व्योमिकाला शिट्टी वाजवायची सवय होती. तिला एका महिलेनं अडवलं. मुलींनी शिट्टी वाजवू नये, असं तिला सांगण्यात आलं, मात्र, तेव्हा तिने मुलगा - मुलगीमध्ये का फरक करता? मुलगा - मुलगी एकसमान असं तिनं उत्तर दिलं होतं. तेव्हा आम्हाला तिचा अभिमान वाटत होता, असं व्योमिकाच्या वडिलांनी सांगितलं.

हवाई दलात भरती होण्याचा निर्णय घेतल्यानंतर व्योमिकानं सर्वात आधी वडिलांना सांगितलं. आईला तिने आधी काहीच सांगितलं नाही. अखेर तिची निवड झाली, तेव्हा व्योमिकानं ही आनंदवार्ता आईला दिली. आनंदाने आईच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. आज व्योमिका सिंग अनेकांसाठी प्रेरणास्त्रोत बनली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : आगामी काळात एकनाथ शिंदेंही ठाकरेंसोबत जातील; पुण्यातील बड्या नेत्याचा दावा

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अखेर एकत्र; या ऐतिहासिक क्षणाची सुरुवात नेमकी कुठून? वाचा सविस्तर...

Maharashtra Live News Update: लालू यादव पुन्हा एकदा बनले राजदचे अध्यक्ष; राष्ट्रीय जनता दलाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत निर्णय

Rebies: रेबीज का होतो, सुरुवातीची लक्षणे कोणती?

Sushil Kedia: एक दणका आणि केडीयाचा माफीनामा; अखरे मराठीद्रष्ट्या सुशील केडियाची अखेर माफी

SCROLL FOR NEXT