Sukhbir Singh Badal saam tv
देश विदेश

पंजाबच्या माजी मुख्यमंत्र्यांवर गोळीबार, अमृतसरमधील सुवर्ण मंदिराबाहेरील घटना

Sukhbir Singh Badal: सुखबिरसिंह बादल यांच्यावर गोळीबार करण्यात आला. अमृतसरच्या सुवर्ण मंदिराजवळ ही घटना घडली आहे.

Surabhi Jayashree Jagdish

पंजाबमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबिरसिंह बादल यांच्यावर हल्ला झाला आहे. अमृतसरमध्ये बादल यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. यावेळी सुखबिरसिंह बादल यांच्यावर गोळीबार करण्यात आला. अमृतसरच्या सुवर्ण मंदिराजवळ ही घटना घडली आहे. या घटनेने एक मोठी खळबळ उडाली आहे.

थोडक्यात वाचले सुखबिरसिंह बादल

पंजाबमध्ये शिरोमणी अकाली दलचे नेते सुखबीर सिंह बादल यांच्यावर गोळीबार करण्यात आला. मात्र या हल्ल्यातून ते थोडक्यात बचावले. सुवर्ण मंदिराच्या गेटवर एका व्यक्तीने त्यांच्यावर गोळीबार केल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हल्लेखोराने गोळीबार करताच घटनास्थळी उपस्थित लोकांनी आरोपीला पकडलं. यावेळी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं आहे. या आरोपीकडून एक पिस्तूलही जप्त करण्यात आलंय. नारायण सिंह असं या आरोपीचं नाव असून तो पक्ष खालसा दलाशी जोडलेला असल्याची प्राथमिक माहिती आहे.

पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीरसिंह बादल मंगळवारपासून अमृतसरच्या सुवर्ण मंदिर म्हणजेच श्री हरमंदिर साहिब गुरुद्वाराबाहेर पहारा देऊन शिक्षा भोगत आहेत. मंगळवारी दुपारी ते व्हीलचेअरवर बसून गुरुद्वारात पोहोचले होते. त्याच्या गळ्यात दोषी ठरण्याची तख्तीही लटकत होती.

शिक्षेच्या पहिल्या दिवशी त्यांनी सुवर्ण मंदिराच्या सामुदायिक स्वयंपाकघरातील भांडीही साफ केली. यावेळी त्यांनी सैनिकांचा पोशाख परिधान केला होता. सुखबीर सिंह बादल यांच्या पायाला फ्रॅक्चर आहे. त्यामुळे व्हीलचेअरवर पहारा देत असल्याची माहिती आहे.

बादल यांना काय शिक्षा झालीये?

शीख समुदायाच्या 'सर्वोच्च न्यायालयाने' म्हणजेच श्री अकाल तख्त साहिबने सुखबीर बादल यांना धार्मिक शिक्षा सुनावलीये. या शिक्षेनुसार ते गुरुद्वारामध्ये सेवा करणार आहे. यामध्ये भांडी धुणं आणि पहारा देणं याचा समावेश आहे. श्री दरबार साहिबमध्ये बांधलेल्या सार्वजनिक शौचालयांचीही स्वच्छता करणार आहे. 2007 ते 2017 या काळात अकाली दल सरकारच्या काळात झालेल्या धार्मिक चुकांसाठी श्री अकाल तख्त यांनी बादल आणि त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना शिक्षा सुनावली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Belly Fat Loss: पोटावरची चरबी वाढत चाललीये? सकाळी १ ग्लास प्या हे ड्रिंक, आठवड्यातच जाणवेल फरक

Political News : खासदार होताच आमदारकीचा राजीनामा दिला, मोदींच्या मंत्रिमंडळात मोठी जबाबदारी मिळणार?

Maharashtra Live News Update: कणकवली-नरडवे रोडवर कारला आग लागून कार जळून खाक

आमदारकी अन् मंत्रिपदासाठी खरातच्या दरबारी खेट्या, 8 वर्षांपासून संपर्क; चाकणकरांनंतर शिवसेनेच्या महिला नेत्या अडचणीत

Navi Mumbai Airport: नवी मुंबई एअरपोर्टवरुन ३० नवीन शहरांसाठी फ्लाइट; नवीन वेळापत्रक जारी

SCROLL FOR NEXT