Sukhbir Singh Badal: बाथरूम स्वच्छ करा,'गळ्यात फलक लावा', अकाल तख्तने सुखबीर बादल यांना कोणत्या प्रकरणात दिली शिक्षा?

Sukhbir Singh Badal: डेरा सच्चा सौदाचे प्रमुख गुरमीत राम रहीम यांच्याबाबत मवाळ वृत्ती स्वीकारल्याचा आणि त्यांच्या ड्रेसच्या वादात त्यांना शिक्षा करण्याऐवजी तक्रार मागे घेतल्याचा आरोप सुखबीर बादल यांच्यावर करण्यात आला.
Sukhbir Singh Badal
Sukhbir Singh Badal:News 24
Published On

शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंग बादल यांना बाथरूम स्वच्छ करण्याची शिक्षा सुनावण्यात आलीय. श्री अकाल तख्त साहिबने बादल आणि त्यांच्या साथीदारांना एक तास स्नानगृह स्वच्छ करण्याची आणि भांडी धुण्यासाठी एक तास लंगरमध्ये जाण्याची शिक्षा दिलीय.

काय होता आरोप

सुखबीर सिंह बादल सोमवारी व्हीलचेअरवर श्री. अकाल तख्त साहिब येथे गेले होते. मिळालेल्या माहितीनुसार, सुखबीर बादल यांच्यावर डेरा सच्चा सौदाचे प्रमुख गुरमीत राम रहीम यांच्याबाबत मवाळ वृत्ती बाळगल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यांच्या पोशाखाच्या वादात शिक्षेऐवजी तक्रार मागे घेतल्याचा आरोप सुखबीर बादल यांच्यावर आरोप होता.

यासह 2012 मध्ये सुमेध सैनी यांची पंजाब पोलीस डीजीपी म्हणून नियुक्ती आणि बरगडी घटनेतील शीख तरुणांच्या हत्येतील पीडितांना न्याय मिळवून देण्यात निष्काळजीपणा केल्याचा आरोपही बादल यांच्यावर होता.

हो किंवा नाही म्हणा

श्री. अकाल तख्तने सुनावणीदरम्यान बादल आणि इतर आरोपींना 'होय' किंवा 'नाही' मध्ये उत्तर देण्यास सांगितले. यावेळी सुखबीर बादल यांनी सर्व प्रश्नांची उत्तरे हो म्हणत दिली. यानंतर बादल यांनी शिक्षा सुनावण्यात आली. अकाल तख्तने शिक्षा सुनावताना स्पष्टपणे सांगितलं की, बादल यांनी आपल्या गळ्यात एक फलक घालावा.

सुनावणीदरम्यान सुखबीर बादल यांनी पंज सिंह साहिबांसमोर आपली चूक कबूल केली. त्याचवेळी प्रेमसिंह चंदूमाजरा म्हणाले की, आपल्यावर लावलेले सर्व आरोप खोटे आहेत. यावर नाराजी व्यक्त करत श्री अकाल तख्तने त्यांना खडसावले. सुनावणीदरम्यान जथेदार म्हणाले की, त्यांच्याकडे वर्तमानपत्रातील कटिंग्ज आहेत ज्यात तुमच्याबद्दल सर्व काही प्रसिद्ध आहे. मग या पापांपासून दूर का पळतात ?असा सवाल त्यांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com