RSS Saam tv
देश विदेश

मी RSSचा सदस्य, संघटनेसाठी पुन्हा काम करण्यासाठी इच्छुक; निवृत्तीच्या भाषणात न्यायाधीश चित्तरंजन दास नेमकं काय म्हणाले?

former Justice chittaranjan das : 'माझ्यामध्ये देशभक्ती निर्माण करण्यास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मोठा वाटा आहे, असं म्हणत न्यायाधीश चित्तरंजन दास यांनी निवृत्तीच्या भाषणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आठवणी सांगितल्या.

Vishal Gangurde

कोलकाता : कोलकाता हायकोर्टाचे न्यायाधीश चित्तरंजन दास यांनी मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सदस्य आहे. माझी लहानपणापासून संघाशी बांधिलकी आहे. माझ्यामध्ये देशभक्ती निर्माण करण्यास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मोठा वाटा आहे, असं म्हणत न्यायाधीश चित्तरंजन दास यांनी निवृत्तीच्या भाषणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आठवणी सांगितल्या.

कोलकत्ता उच्च न्यायालयाचे न्यायाधीश चित्तरंजन दास निवृत्त झाले आहेत. निवृत्तीच्या भाषणात न्यायाधीश चित्तरंजन दास यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं कौतुक केलं. चित्तरंजन दास म्हणाले, 'आज मी एका संघटनेचे आभार व्यक्त करु इच्छित आहे. मी बालपण ते तारुण्यापर्यंत या संघटनेसोबत होतो. मला तिथे धाडसी आणि प्रामाणिक, देशभक्तीची शिकवण मिळाली. मी स्वीकार केला पाहिजे की, मी आरएसएसचा सदस्य होतो आणि आहे. मी कामामुळे जवळपास ३७ वर्ष या संघटनेपासून दूर होतो'.

'मी करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी या संघटनेचा वापर केला नाही. कारण हे आमच्या सिद्धांताच्या विरोधात आहे. प्रत्येकाला एका तराजूमध्ये तोलू नये. तो व्यक्ती कम्युनिष्ट, भाजप, काँग्रेस किंवा टीएमसीशी संबंधित असेल. माझा कोणाशीही संबंध नाही. माझं यांच्याशी काही देणेघेणं नाही. मी कोणत्याही राजकीय व्यक्तीच्या विरोधात नाही. माझ्यासाठी सर्व समान आहेत. मी दोन सिद्धांतावर न्याय देण्याचा प्रयत्न केला. एक सहानुभूती आणि न्याय या दोन्ही सिद्धांतावर काम केलं, असे ते म्हणाले.

मी 'आरएसएस'सोबत पुन्हा काम करण्यास इच्छुक आहे. कारण मी आता निवृत्त झालो आहे. मला कोणत्याही मदतीसाठी बोलावलं तर काम करण्यास सक्षम आहे. मी संघटनेत पुन्हा काम करण्यासही तयार आहे, असेही त्यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Malaika Arora: फिटनेस क्विन मलाइका अरोराचं वय नक्की किती?

Puran Poli Ice Cream Recipe : सणासुदीला आवर्जून घरी ट्राय करा पुरणपोळी आईस्क्रीम, फॉलो करा सिंपल रेसिपी

Health Tips: जमिनीवर बसून जेवल्याने काय होते? फायदे की तोटे

Kajal Smudge Tips: काजळ लावल्यावर लगेच पसरतं? मग या ५ टिप्स वापराच, डोळे दिसतील सुंदर अन् टपोरे

Stomach Cancer Symptoms: पोटात खूपच दुखतय? करू नका दुर्लक्ष, असू शकतं कॅन्सरचं हे लक्षण

SCROLL FOR NEXT