Sri Lanka Thailand Indonesia flood and landslide full report : श्रीलंका, थायलंड, इंडोनेशिया देशावर आलेल्या अस्मानी संकटाने होत्याचे नव्हते झाले. पूर आणि भूस्खलनामुळे जनजीवन विस्कळीत झाले. आतापर्यंत १३०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला, तर ८०० पेक्षा जास्त लोक बेपत्ता आहेत. सध्या बचावकार्य वेगात सुरू आहे. बेघर झालेल्यांना मदत केली जात आहे. श्रीलंकेला भारताकडून आपतकालीन मदत केली जात आहे. श्रीलंकेचा माजी कर्णधार सनथ जयसूर्या याच्याकडून भारताचे आभार व्यक्त केले आहेत.
गेल्या ८ ते १० दिवसांपासून श्रीलंका, थायलंड, इंडोनेशियामध्ये मुसळधार पावसाने हाहाकार माजवलाय. पावसामुळे अनेक भाग पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे हजारो लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. पावसामुळे अनेक भाग पाण्याखाली गेले. हजारो लोक पूराच्या पाण्यात अडकले आहेत. जीव वाचवण्यासाठी अनेक जण छतावर आणि झाडांवर बसून मदतीची वाट पाहत आहेत. बचावपथकाकडून मदत केली जात आहे.
पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती परिस्थिती झाली आहे. त्यात अनेक ठिकाणी भूस्खलनही झाले आहे. या अस्मानी संकटात आतापर्यंत १,३०३ लोकांचा मृत्यू झाला. इंडोनेशियामध्ये ७१२, श्रीलंकेत ४१० आणि थायलंडमध्ये १८१ लोकांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती मंगळवारी एका अधिकाऱ्याने दिली. तर ८०० पेक्षा जास्त जण बेपत्ता आहेत.
इंडोनेशियामध्ये सर्वात जास्त नुकसान झालेल्या ठिकाणांमध्ये सुमात्रा बेटाचा समावेश आहे. या परिसरातील रस्ते वाहून गेले आणि पूल कोसळले आहेत. त्यामुळे गावापर्यंत बचाव पथकाला पोहचण्यासाठी संघर्ष करावा लागतोय. इंडोनेशिया आपत्ती व्यवस्थापन संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, ५०७ लोक बेपत्ता आहेत. हेलिकॉप्टर आणि बोटी मदतीसाठी तैनात करण्यात आल्या आहेत. पण हवामान खराब अशल्यामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत. दरम्यान, श्रीलंकामध्ये ३३६ जण बेपत्ता आहेत. लष्कराच्या मदतीने बचावकार्य केले जात आहेत. पण भूस्खलनामुळेबाधित भागात पोहोचणे कठीण झाले आहे. दक्षिण थायलंडमध्ये १५ लाखांहून अधिक घरे बाधित झाले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.