Australia Floods वृत्तसंस्था
देश विदेश

Australia Floods: ऑस्ट्रेलियाच्या पूर्व किनारपट्टीला पुराचा मोठा तडाखा, 7 जणांचा मृत्यू

ऑस्ट्रेलियाचा तिसरे सर्वात जास्त लोकसंख्या असणारे शहर ब्रिसबेन (Brisbane) मध्ये मुळसळधार पाऊस सुरु आहे यामुळे येथे अनेक भागात पाणी साचले आहे.

वृत्तसंस्था

ऑस्ट्रेलिया: ऑस्ट्रेलियाचा तिसरे सर्वात जास्त लोकसंख्या असणारे शहर ब्रिसबेन (Brisbane) मध्ये मुळसळधार पाऊस सुरु आहे यामुळे येथे अनेक भागात पाणी साचले आहे. पूर्व किनारपट्टीवर आलेल्या पुरामुळे (Australia Floods) आत्तापर्यंत 7 लोकांचा मृत्यू झाला आहे.

ब्रिसबेन आणि त्याच्या जवळच्या भागात 2011 नंतर आलेला हा सर्वात मोठा पूर आहे. त्यावेळेसच्या मुसळधार पावसामुळे 26 लाख लोकसंख्या असणारे शहर पाण्याखाली गेले होते. क्वीन्सलँड राज्य पोलिसांनी आज सांगितले की, ब्रिस्बेनमधील 59 वर्षीय व्यक्ती रविवारी पायी चालत एक छोटी नदी पार करण्याचा प्रयत्न करत असताना बुडाली आहे. क्वीन्सलँड आपत्कालीन सेवेने ब्रिस्बेनच्या दक्षिणेकडील गोल्ड कोस्ट शहराच्या काही भागांमध्ये पुराचा इशारा जारी केला आहे. तसेच लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

क्वीन्सलँड अग्निशमन आणि आपत्कालीन सेवेने सांगितले की अनेक भागांशी संपर्क तुटला आहे, अशी माहिती दिली आहे. पुरामुळे सर्व सात मृत्यू क्वीन्सलँड राज्यात झाले आहेत, ज्याची राजधानी ब्रिस्बेन आहे. आजपर्यंत, ब्रिस्बेनच्या उपनगरात 2145 घरे आणि 2356 दुकाने पाण्याखाली गेली आहेत. तसेच येथे पाण्याची पातळी वाढत आहे, ज्यामुळे काही 10,827 इतर मालमत्ता अंशतः पाण्याखाली जाण्याचा धोका आहे.

हे देखील पहा-

न्यूज एजन्सीनुसार, ब्रिस्बेनचे लॉर्ड मेयर एड्रियन स्क्रीनर म्हणाले की, यावेळचा पूर 2011 च्या पुरापेक्षा वेगळा आहे, कारण या भागात पाच दिवस पाऊस पडत आहे, तर 2011 मध्ये ब्रिस्बेन नदीची पातळी वाढण्यापूर्वी अनेक दिवस पाऊस थांबला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: रत्नागिरीत अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या

Suraj Chavan: 'मला वेड लावलयं...'म्हणतं रितेश भाऊंच्या गाण्यावर गुलीगत सूरजनं धरला ठेका, Video पाहा

Candidate List Party wise : निवडणूकीच्या रिंगणात किती पक्षांचे उमेदवार, शिवसेना-ठाकरे कोणत्या क्रमांकावर? अशी आहे संपूर्ण यादी

TMKOC Fame Jheel Mehta: कोण आहे भिडेंचा जावई? 'तारक मेहता' फेम सोनू लवकरच अडकणार लग्नबंधनात; तारीखही ठरली

IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सिरीजपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का; प्रॅक्टिसदरम्यान 'या' फलंदाजाच्या हाताला दुखापत

SCROLL FOR NEXT