रायगड: अत्याचाराचा FIR झालेले पत्र भाजप आमदार पुत्राने केले व्हायरल; कोर्टाने सुनावली शिक्षा

भाजप आमदार पुत्र वैकुंठ पाटीलसह दोन जणांना पोस्ट व्हायरल करणे महागात पडले आहे.
जिल्हा व सत्र न्यायालय अलिबाग, वैकुंठ पाटील
जिल्हा व सत्र न्यायालय अलिबाग, वैकुंठ पाटीलराजेश भोस्तेकर
Published On

राजेश भोस्तेकर

रायगड : पेणचे (Pen) भाजपाचे आमदार रवींद्र पाटील यांचे पुत्र वैकुंठ पाटील यांनी पोस्को गुन्ह्यातील एफआरए सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल करणे चांगलेच महागात पडले आहे. तंत्रज्ञान अधिनियम अंतर्गत अलिबाग पोस्को न्यायालयाने वैकुंठ पाटील यांना तीन महिन्यांची कैदेची शिक्षा सुनावली आहे. इतर दोन जणांनाही न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. वैकुंठ पाटील यांची जामिनासाठी मात्र धावपळ सुरू आहे. (Alibaug News In Marathi)

जिल्हा व सत्र न्यायालय अलिबाग, वैकुंठ पाटील
Breaking: नवाब मलिक यांच्या मुलाला ईडीचे समन्स !

पेण येथे एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा गुन्हा पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. सदर गुन्ह्याची एफआयआर (FIR) प्रत वैकुंठ पाटील आणि त्याच्या दोन साथीदार यांनी सोशल मीडियावर व्हायरल केली होती. त्यामुळे संबंधितांची बदनामी झाली होती. याबाबत संबंधितांनी पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यानुसार पोलिसांनी अलिबाग (Alibaug) न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. (Raigad News Updates)

हे देखील पहा-

अलिबाग पोस्को न्यायालयात याबाबत आज सुनावणी झाली. यामध्ये वैकुंठ पाटील यांच्यासह दोन जणांवर आरोपपत्र सिद्ध झाल्याने न्यायाधीश शाहीदा शेख यांनी तीन महिन्यांनी कैदेची शिक्षा सुनावली आहे.

भाजप (BJP) आमदार पुत्राला शिक्षा झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. वैकुंठ पाटील हे जामिनासाठी न्यायालयात अर्ज करणार आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com