INDIA Bloc Leaders Protest Saam Tv
देश विदेश

VIDEO : संसदेत खासदारांचा शपथविधी, बाहेर संविधान हातात घेऊन विरोधकांची जोरदार घोषणाबाजी; दिल्लीत नेमकं काय घडतंय?

Priya More

18 व्या लोकसभेचे पहिल्या अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली. संसदेच्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्ष आक्रमक झाला आहे. विरोधी पक्षाच्या खासदारांनी संसदेबाहेर निदर्शने केली. संसदेत नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी सुरू असताना संसदेबाहेर इंडिया आघाडच्या खासदारांनी हातामध्ये संविधानाची प्रत घेऊन जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे हेही उपस्थित होते.

१८ व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाची सुरूवात आजपासून झाली. अधिवेशनाची सुरूवातच पतंप्रधान नरेंद्र मोदींसह नवनिर्वाचित खासदारांच्या शपथविधी सोहळ्याने झाली. रविवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भाजपचे खआसदार भर्तृहरी महताब यांना लोकसभेचे प्रोटेम स्पीकर म्हणून शपथ दिली. येत्या २६ जून रोजी लोकसभा अध्यक्षांची देखील निवड केली जाणार आहे. हे अधिवेशन ३ जुलै रोजी संपणार आहे.

१८ व्या संसदेच्या पहिल्या अधिवेशनाला सुरूवात होताच इंडिया आघाडीचे नेते आणि खासदार आक्रमक झाले आहेत. यावेळी त्यांनी संविधानाची प्रत हातात घेत मोदी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच त्यांनी मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. या अधिवेशनात इंडिया आघाडीचे खासदार मोदी सरकारला NEET-UG आणि NET परीक्षांमधील गोंधळ, संसद भवन संकुलातील कायद्यांचे स्थलांतर आणि नियुक्ती करण्याचा सरकारचा निर्णय अशा अनेक मुद्द्यांवर घेरण्याच्या तयारीत आहेत.

दरम्यान, संसदेचे अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नवीन खासदारांचे स्वागत केले. सर्वांना बरोबर घेऊन चालणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी पीएम मोदींनी विरोधकांवर देखील निशाणा साधला. 'देशातील जनतेला विरोधकांकडून चांगल्या पावलांची अपेक्षा आहे. लोकशाहीची प्रतिष्ठा राखली जावी अशी अपेक्षा आहे. विरोधक यावर टिकून राहतील असा मला पूर्ण विश्वास आहे. लोकांना सस्टेन पाहिजे स्लोगन नकोय.' तसंच, भारताला गरिबीतून मुक्त करायचे असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Budh Uday: ऑक्टोबर महिन्यात बुध ग्रहाचा होणार उदय; 'या' राशींचे सुरु होणार अच्छे दिन

Rain Alert : मराठवाडा-विदर्भात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता; मुंबई-पुण्यात कसं असेल वातावरण? वाचा वेदर रिपोर्ट

Rashi Bhavishya Today : श्री महालक्ष्मीची कृपा होणार, 'या' ६ राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; वाचा तुमचे राशिभविष्य

Horoscope Today : गुंतवणुकीसाठी योग्य दिवस, मोठा फायदा होण्याची शक्यता; वाचा आजचे तुमचे राशीभविष्य

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT