Baba Ramdev Latest News Saam Tv
देश विदेश

Baba Ramdev : योगगुरू बाबा रामदेव यांच्यावर गुन्हा दाखल, धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप

राजस्थानच्या बारमेर जिल्ह्यातील चौहतान पोलीस ठाण्यात एका व्यक्तीच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

साम टिव्ही ब्युरो

FIR Filed Against Baba Ramdev : राजस्थान दौऱ्यावर आलेले योगगुरू बाबा रामदेव यांच्यावर धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला. राजस्थानच्या बारमेर जिल्ह्यातील चौहतान पोलीस ठाण्यात एका व्यक्तीच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

राजस्थानच्या बारमेर जिल्ह्यात एका सभेत मुस्लिमांनी दहशतवादी कृत्ये केल्याचा आणि हिंदू महिलांचे अपहरण केल्याचा आरोप असलेला एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, रविवारी राजस्थान पोलिसांनी योगगुरू बाबा रामदेव (Baba Ramdev) यांच्या विरोधात एफआयआर दाखल केला.

दोन दिवसांपासून बाबा रामदेव यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ राजस्थानच्या बारमेर जिल्ह्यातील आहे. रामदेव बाबा यांच्याविरोधात आयपीसीच्या कलम 153ए, 295अ आणि 298 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती स्थानिक पोलीस (Police) अधिकाऱ्यांनी दिली आहे.

काय म्हणाले रामदेव बाबा?

 'इस्लाम धर्माचा अर्थ फक्त नमाज अदा करणे आहे. मुस्लिमांसाठी फक्त नमाज अदा करणे आवश्यक आहे आणि नमाज अदा केल्यानंतर तुम्ही काहीपण करु शकता. तुम्ही हिंदू मुलींना उचलून न्या, किंवा जिहादच्या नावाखाली दहशतवादी व्हा, तुमच्या मनात येईल ते करा, पण दिवसातून ५ वेळा नमाज पठण करा. पाचवेळा नमाज पठण केल्यानंतर जन्नत मिळते अशी जन्नत जहन्नुमपेक्षा वाईट आहे. असे रामदेव बाबा म्हणाले होते.

योगगुरू बाबा रामदेव यांनी आरोप केला की इस्लाम आणि ख्रिश्चन हे दोन्ही धर्मांना धर्मांतराचे वेड लागले आहे, तर हिंदू धर्म आपल्या अनुयायांना चांगले जीवन जगण्यास शिकवतो, असे रामदेव बाबांनी म्हटले होते.

यापूर्वीही वादग्रस्त विधाने

यापूर्वी पतंजली योगपीठावर प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमानंतर ते म्हणाले होते की, लवकरच पाकिस्तानचे चार तुकडे केले जातील. सिंध, बलुचिस्तान, पंजाब आणि पाकव्याप्त काश्मीर ही सर्व स्वतंत्र राष्ट्रे होतील आणि पाकिस्तान वेगळा देश राहील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'लग्नापूर्वी मी कुणासोबत शरीरसंबंध आणि कुणासोबत नाही..' बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रीचं स्टेटमेंट चर्चेत

Maharashtra Live News Update : कोंढव्यात पोलिसांसोबत झालेल्या झटापटीनंतर ड्रग्स पेडलरचा मृत्यू

Mumbai Fire: मालाडच्या पठाणवाडी परिसरातील १५ ते २० गोडाऊनला भीषण आग|Video Viral

Mumbai To Rameswaram Temple: मुंबईहून तामिळनाडूतील प्रसिद्ध रामेश्वरम मंदिराला भेट द्यायचे आहे? जाणून घ्या सर्वोत्तम मार्ग

Ranveer Singh: भारतातील सर्वात महागड्या जाहिरातीसाठी रणवीर सिंग आणि लॉर्ड बॉबी एकत्र; बजेट पाहून नेटकरी व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT