Balasaheb Thorat News
Balasaheb Thorat NewsSaam Tv

Balasaheb Thorat : बाळासाहेब थोरातांची कन्या जयश्री अचानक झाल्या भावुक; म्हणाल्या...

"वडिलांवर करण्यात आलेल्या आरोपांबद्दल वाईट वाटतं"
Published on

सचिन बनसोडे

Ahmednagar News : काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात हे खांद्याला झालेल्या दुखापतीमुळे गेल्या महिनाभरापासून मुंबईत उपचार घेत असून ते संगमनेर मतदारसंघात येऊ शकले नाहीत.

थोरात यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी संगमनेरमधील (Sangamner) हजारो नागरिक उपस्थित होते. यावेळी थोरात यांच्या प्रकृतीबद्दल माहिती देताना कन्या जयश्री थोरात या भावुक झाल्याचे बघायला मिळाले.

Balasaheb Thorat News
Pune news : एका मांजरीवरून 2 बायकांची जुंपली; वाद थेट पोलीस ठाण्यात

वडिलांच्या ऑपेशन बद्दल आणि त्यांना किती लागलंय हे डॉक्टर जेंव्हा सांगतात तो क्षण आठवतो तेंव्हा दाटून येतं. आमच्या सर्वांसाठी तो अवघड क्षण होता. डॉक्टरांच्या (Doctor) परवानगीनंतर ते परत येतील असे जयश्री थोरात म्हणाल्या.

Balasaheb Thorat News
Solapur Crime : धक्कादायक! कौटुंबिक वादातून तरुणाचा खून; सोलापूर येथील घटना

पुढे बोलताना जयश्री म्हणल्या की, वडिलांवर करण्यात आलेल्या आरोपांबद्दल वाईट वाटतं. त्यांचा स्वभाव सर्वांना घेऊन चालणारा आहे. जेंव्हा अशा पध्दतीने काही घटना होतात तेंव्हा वाईट वाटतं अशी प्रतिक्रिया जयश्री थोरात यांनी गेल्या काही दिवसात झालेल्या राजकारणाबद्दल दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com