Halwa Ceremony Saam Tv
देश विदेश

Halwa Ceremony: नॉर्थ ब्लॉकमध्ये हलवा समारंभ, 1 फेब्रुवारीला सादर होणार अर्थसंकल्प

Budget 2024: अर्थसंकल्प 2024 तयार करण्याच्या प्रक्रियेचा अंतिम टप्पा म्हणून ओळखला जाणारा हलवा समारंभ आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या उपस्थितीत नॉर्थ ब्लॉक येथे पार पडला.

साम टिव्ही ब्युरो

Halwa Ceremony:

हंगामी केंद्रीय अर्थसंकल्प 2024 तयार करण्याच्या प्रक्रियेचा अंतिम टप्पा म्हणून ओळखला जाणारा हलवा समारंभ आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या उपस्थितीत नॉर्थ ब्लॉक येथे पार पडला. यावेळी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड हे देखील उपस्थित होते. दरवर्षी अर्थसंकल्प तयार करण्याची "लॉक-इन" प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी पारंपरिक हलवा समारंभ आयोजित केला जातो.

मागील तीन पूर्ण केंद्रीय अर्थसंकल्पांप्रमाणे, यंदाचा हंगामी केंद्रीय अर्थसंकल्प 2024 देखील पेपरलेस असणार आहे. 1 फेब्रुवारी 2024 रोजी अंतरिम केंद्रीय अर्थसंकल्प 2024 सादर केला जाणार आहे.  (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

राज्य घटनेत विहित केल्याप्रमाणे, वार्षिक वित्तीय विवरण (सामान्यपणे अर्थसंकल्प म्हणून ओळखले जाते), अनुदानाच्या मागण्या, वित्त विधेयक यांसह सर्व केंद्रीय अर्थसंकल्पीय दस्तावेज "केंद्रीय अर्थसंकल्प मोबाइल अॅप" वर उपलब्ध असेल. डिजिटल सुविधेचा सर्वात सोपा प्रकार वापरून संसद सदस्य (खासदार) आणि सामान्य लोकांना हे अर्थसंकल्प दस्तावेज सहज पाहता येतील. हे दोन भाषांमध्ये (इंग्रजी आणि हिंदी) आहे आणि Android आणि iOS दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असेल. केंद्रीय अर्थसंकल्प वेब पोर्टल (www.indiabudget.gov.in) वरून देखील हे अॅप डाउनलोड करता येईल. (Latest Marathi News)

हलवा समारंभाला केंद्रीय अर्थमंत्र्यांसोबत वित्त आणि व्यय सचिव डॉ. टी.व्ही. सोमनाथन, आर्थिक व्यवहार सचिव अजय सेठ, गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे सचिव तुहीन कांता पांडे, महसूल सचिव संजय मल्होत्रा, सचिव, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ चे अध्यक्ष नितीन गुप्ता, केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळ चे अध्यक्ष संजय कुमार अग्रवाल, आणि अतिरिक्त सचिव (अर्थसंकल्प) आशिष वाछानी, तसेच अर्थसंकल्पाची तयारी आणि संकलन प्रक्रियेत सहभागी अर्थ मंत्रालयाचे इतर अधिकारी आणि कर्मचारी देखील यावेळी उपस्थित होते.

समारंभाचा एक भाग म्हणून, केंद्रीय अर्थमंत्र्यांनी बजेट प्रेसची देखील पाहणी केली आणि संबंधित अधिकाऱ्यांना शुभेच्छा देण्याबरोबरच तयारीचा आढावा घेतला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Politics: मधुरिमाराजेंच्या माघारीची INSIDE STORY; कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काय घडलं?

Assembly Election: एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये संघर्ष; शिंदेविरुद्ध दोन ठाकरे

Maharashtra Election: महायुतीनं केलंय काम भारी! लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये, कोल्हापुरात महायुतीची १० वचनं

Maharashtra News Live Updates: भाजपचा मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना पाठिंबा

Uddhav Thackeray: पीएम मोदींच्या अशुभ हातांनी बांधलेला पुतळा पडला'; उद्धव ठाकरेंची टीका

SCROLL FOR NEXT