UP Car Accident Saa Tv
देश विदेश

Accident: भरधाव कारचा अचानक टायर फुटला, अनियंत्रित होत तलावात कोसळली; चौघांचा मृत्यू; थरारक VIDEO

UP Car Accident: लग्न सोहळ्यावरून परत येताना भयंकर अपघात झाला. भरधाव कारचा टायर फुटला आणि ही कार थेट तलावात कोसळली. या अपघातामध्ये चौघांचा मृत्यू झाला. तर ५ जण जखमी झाले.

Priya More

Summary -

  • उत्तर प्रदेशच्या फतेहपूर जिल्ह्यात भीषण कार अपघात झाला

  • कार अपघातामध्ये चौघांचा मृत्यू झाला तर ५ जण जखमी झाले

  • भरधाव कारचा टायर फुटल्याने कार तलावात कोसळली

  • लग्न सोहळ्यावरून परत येत असताना हा अपघात झाला

उत्तर प्रदेशमध्ये भीषण कार अपघातामध्ये चौघांचा मृत्यू झाला. उत्तर प्रदेशच्या फतेहपूर जिल्ह्यामध्ये ही घटना घडली. भरधाव कारचा अचानक टायर फुटला. कार अनियंत्रित होऊन थेट तलावात कोसळली. या अपघातामध्ये चौघांचा जागीच मृत्यू झाला. तलावात पाणी असल्यामुळे अनेकांना बाहेर पडता आले नाही. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिस सध्या या अपघाताचा तपास करत आहेत.

फतेहपूर जिल्ह्यातल्या कानपूर-प्रयागराज नॅशनल हायवेवर बुधवारी सकाळी हा अपघात झाला. लग्न सोहळ्यावरून घरी परत येत असताना ही घटना घडली. भरधाव कारचा टायर फुटला आणि ही कार अनियंत्रित होत पाण्याने भरलेल्या तलावात कोसळली. पाण्यात गुदमरून चौघांचा मृत्यू झाला. सर्वांचे मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. या अपघातामध्ये ५ जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

प्रयागराजच्या सब्जी मंडी खुल्दाबादवरून हे ९ जण कारने कानपूर येथील मोतीझील येथील वाल्मिकी आश्रमामध्ये लग्नासाठी गेले होते. लग्न सोहळा आटपून ते बुधवारी सकाळी परत येत होते. त्याचवेळी ओव्हर ब्रिजजवळ कारचा टायर फुटला. त्यामुळे चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार तलावात पडली. कारमध्ये पाणी शिरल्यामुळे चौघांचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कारमधील ५ जणांना सुखरुप बाहेर काढले. तर मृत्यू झालेल्या चौघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. साहिल गुप्ता, शिवम साह, रितेशन सोनकर, राहुल केसरवानी या चौघांचा अपघातामध्ये मृत्यू झाला. कार चालक राहुल कुमार, महेश, अमित, सुमित, नीरज या सर्व पाचही जणांचे प्राण वाचले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Leopard Terror: 15 दिवसांत बिबट्याने घेतला तिघांचा बळी,'नरभक्षक बिबट्याला गोळ्या घाला', गावकरी आक्रमक

Vote Chori: व्होटचोरीला हिंदू-मुस्लीमचा रंग; बोगस मतदारांचा फायदा नेमका कुणाला?

Maharashtra Politics: हर्षवर्धन पाटील पुन्हा भाजपच्या वाटेवर? भरसभेत मुख्यमंत्री,पंतप्रधानांचे गायले गोडवे

BMC Election : आगामी निवडणुकीत RPI महायुतीतून लढणार, पण...; रामदास आठवलेंनी सगळंच सांगितलं

₹23 Crore Bull Not Dead: 23 कोटींच्या 'अनमोल'चा मृत्यू? हट्टाकट्टा रेड्याला अचानक काय झालं?

SCROLL FOR NEXT