Singer Passes Away: आधी बाईकवरुन अपघात, नंतर हार्ट अटॅक; प्रसिद्ध गायकाची मृत्यूशी झुंज ठरली अपयशी

Singer Passes Away: पंजाबी संगीतविश्वाला मोठा धक्का बसला आहे. लोकप्रिय गायक राजवीर जवंदा यांचे वयाच्या 35 व्या वर्षी निधन झाले आहे.
Singer Passes Away
Singer Passes AwaySaam tv
Published On
Summary

प्रसिद्ध पंजाबी गायक राजवीर जावंदा यांचे निधन झाले आहे.

२७ सप्टेंबर रोजी त्यांचा भीषण दुचाकी अपघात झाला होता.

१२ दिवसांपासून रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत होते.

Singer Passes Away: पंजाबी संगीतविश्वाला मोठा धक्का बसला आहे. लोकप्रिय गायक राजवीर जवंदा यांचे वयाच्या 35 व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्या मृत्यूची बातमी समोर आल्यानंतर संपूर्ण पंजाब आणि संगीतसृष्टीत शोककळा पसरली आहे. राजवीर जवंदा हे त्यांच्या दमदार आवाजामुळे आणि ग्रामीण पार्श्वभूमीवरील गाण्यांमुळे प्रचंड लोकप्रिय झाले होते.

मृत्यूचे कारण

माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी हिमाचल प्रदेशातील बद्दी परिसरात राजवीर जवंदा यांचा गंभीर मोटरसायकलवरुन अपघात झाला होता. या अपघातात त्यांच्या डोक्याला आणि पाठीच्या कण्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तात्काळ मोहाली येथील फोर्टिस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी त्यांना ICU मध्ये वेंटिलेटरवर ठेवले, परंतु सुमारे 12 दिवसांच्या उपचारांनंतर त्यांची प्रकृती अधिकच खालावली आणि अखेर कार्डियक अटॅकने त्यांचे निधन झाले.

Singer Passes Away
Face Care: नॅचरल ग्लोईंग चेहरा हवा असेल; मग रोज रात्री 'या' आइस क्यूबने चेहऱ्याचा मसाज नक्की करा

राजवीर जवंदा यांनी आपल्या करिअरमध्ये अनेक हिट गाणी दिली होती, यामध्ये मेरा दिल”, “कंगनी”, “पटियाला शाही पग” आणि “सरदार'' या गाण्यांचा समावेश आहे. त्यांच्या गाण्यांनी केवळ पंजाबच नव्हे तर देशभरातील संगीतप्रेमींवर छाप सोडली होती.

Singer Passes Away
Bharti Singh Pregnancy: कॉमेडियन भारती सिंग ४१व्या वर्षी पुन्हा होणार आई; क्यूट स्टाईलमध्ये दिली गुड न्यूज

त्यांच्या निधनावर पंजाब काँग्रेस अध्यक्ष अमरिंदर सिंह राजा यांनी सोशल मीडियावरून श्रद्धांजली व्यक्त केली. त्यांनी म्हटले, “राजवीर जवंदा हे एक प्रतिभावान कलाकार होते. त्यांचा आवाज लोकांच्या मनात सदैव गुंजत राहील. त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सर्व सहभागी आहोत.” राजवीर जवंदा यांच्या जाण्याने पंजाबी संगीतसृष्टीत मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या चाहत्यांनी सोशल मीडियावरून भावपूर्ण पोस्ट करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com