FASTag Annual Pass Saam Tv
देश विदेश

FASTag Annual Pass: ३००० रुपयांचा वार्षिक FASTag मिळणार; तुमच्या मनातील १० प्रश्नांची उत्तरे घ्या जाणून

FASTag Annual Pass Explainer: नितीन गडकरी यांनी ३००० रुपयांच्या वार्षिक पासची घोषणा केली आहे. हा पास एका वर्षासाठी किंवा २०० ट्रीपसाठी असणार आहे.

Siddhi Hande

काल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी फास्टॅग पासची घोषणा केली आहे. यामुळे लाखो वाहनधारकांना फायदा होणार आहे. आता वाहनधारकांना ३००० रुपयांचा वार्षिक पास मिळणार आहे. यामध्ये वाहनधारक वर्षभर प्रवास करु शकणार आहेत किंवा २०० ट्रीपसाठी हा पास वैध असणार आहे.

अनेक लोक राष्ट्रीय महामार्गावरुन प्रवास करतात. नेहमी अप-डाउन करणाऱ्या लोकांना हा टोल महाग वाढतो. त्यामुळेच हा मोठा निर्णय घेतला आहे. यामध्ये ३००० रुपयांचा वार्षिक फास्टॅग NHAI टोल पास मिळणार आहे. या पासबाबत अनेक प्रश्न वाहनधारकांच्या मनात निर्माण झाले आहेत. आज आम्ही तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे देणार आहोत.

१. वार्षिक FASTag टोल पास सिस्टीम कसं काम करणार?

वार्षिक फास्टॅग सिस्टीमअंतर्गत तुम्हाला ३००० रुपयांचा पास दिला जाईल. हा पास २०० ट्रीपसाठी किंवा एका वर्षासाठी वापरु शकतात.

२. २०० ट्रीप वर्ष पूर्ण होण्याआधी झाल्या तर काय करावे?

जर तुमचा हा वार्षिक पास वेळेआधी संपला म्हणजेच तुम्ही २०० वेळा या पासचा वापर केला तर तुम्हाला पुन्हा रिचार्ज करता येणार आहे. तुम्ही पुन्हा ३००० रुपयांचा रिचार्ज करु शकतात.

३. काही ठिकाणी फास्टॅग पार्किंग चार्जपण घेतला जातो तेव्हा हा पास कसा काम करणार ?

३००० रुपयांच्या वार्षिक पासमध्ये पाकिंगचे पैसे कापले जाणार नाही. तुमच्या मेन बॅलेंसमधून हे पैसे कापले जातील.

४. सर्व टोल प्लाझा किंवा फक्त NHAI च्या टोल प्लाझांवर हा पास चालणार?

हा नवीन वार्षिक टोल पा फक्त NHAI च्या टोल प्लाझावर चालणार आहे. यामध्ये राष्ट्रीय महामार्ग (NH)आणि राष्ट्रीय एक्सप्रेसवेचा (NE)समावेश आहे.

५. हा नवीन टोल पास सर्व वाहनांसाठी आहे?

हा टोल पास फक्त काही वाहनांसाठी असणार आहे. सध्या हा टोल पास फक्त कार-जीप, व्हॅन आणि गैर व्यव्हारिक वाहनांसाठी मान्य असणार आहे.

६. नवीन टोल पास कसा मिळणार आणि रिचार्ज कसा करायचा ?

तुम्ही रिचार्ज करण्यासाठी राजमार्ग यात्रा अॅप (Rajmarg Yatra App) किंवा HAI / MoRTH की वेबसाइटवर जाऊन करु शकतात. त्यासाठी तुम्हाला लिंक उपलब्ध करुन दिली जाईल.

७. ६० किलोमीटरच्या आता येणाऱ्या टोल प्लाझांबाबत समस्या दूर होणार का?

या फास्टॅग पासमुळे ६० किलोमीटरमधील येणाऱ्या दोन टोल प्लाझांबाबत असणाऱ्या समस्येचं समाधान होईल. यासाठी सिस्टीम तयार करण्यात येत आहे.

८.हा पास कसा अॅक्टिव्हेट होणार?

हा पास घेण्यासाठी जुन्या फास्टॅगचं व्हेरिफिकेशन करणे गरजेचे आहे. हा पास अॅक्टिव्ह केला जाईल. यासाठी तुम्हाला नवीन फास्टॅग खरेदी करण्याची गरज पडणार नाही.

९.हा पास दुसऱ्या वाहनासाठी ट्रान्सफर केला जाऊ शकतो का?

हा पास नॉन ट्रान्सफरेबल आहे. हा पास फक्त रजिस्टर कारसाठीच वॅलिड असणार आहे. जर हा पास दुसऱ्या वाहनांना लावला तर तो रद्द केला जाईल.

१०. सर्व वाहनांना वार्षिक पास बनवावा लागेल?

हा पास घेण्यासाठी कोणतीही सक्ती नसणार आहे. तुम्हाला टोल पास घ्यायचा असेल तर घेऊ शकतात. आणि जर नसेल घ्यायचा तर ती तुमची इच्छा असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bank Holiday News: पुढील आठवड्यात सलग 4 दिवस बँका बंद; SBI, HDFC सह सर्व बँकांच्या ग्राहकांनी आधीच तपासा सुट्ट्यांची यादी

Maharashtra News Live Update: जुन्नर तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाचे आगमन; गुंजाळवाडी, वडगाव सहाणी आणि सावरगाव परिसराला दिलासा

रोज सकाळी प्या मनुक्याचं पाणी, हे 5 आजार दूर होतील

विकृतीचा कळस! ६० वर्षीय नराधमांचा 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार; कल्याण हादरलं

Breaking: सी-फूड एक्सपोर्ट कंपनीमध्ये मोठी दुर्घटना, गॅसची गळती होऊन ७ महिला कामगारांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT