Siddhi Hande
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी टोलसंदर्भात आज महत्त्वाची घोषणा केली आहे.
वाहनधारकांसाठी वार्षिक फास्टॅग टोल पास सुरु करणार असणार असल्याचे सांगितले आहे.
वाहनधारकांसाठी ३००० रुपयांचा वार्षिक फास्टॅग पास सुरु करणार आहे.
आता तुम्हाला एक्सप्रेस वे, महामार्गावरुन प्रवास करताना फास्टॅगसाठी रांगा लावण्याची गरज भासणार आहे.
फास्टॅग वार्षिक पास हा एका वर्षासाठी किंवा २०० ट्रिपसाठी असणार आहे.
हा फास्टॅग वार्षिक पास कार, जीप, व्हॅनसाठी असणार आहे.
महामार्गावरील प्रवास हा अधिक जलद आणि सुलभ होण्यासाठी ही नवीन पॉलिसी सुरु करण्यात आली आहे.
हा फास्टॅग वार्षिक पास तुम्हाला १५ ऑगस्ट २०२५ पासून मिळणार आहे.
याबाबत रजिस्ट्रेशन प्रक्रिया लवकरच सुरु केली जाणार आहे. राजमार्ग यात्रा अॅप, NHAI किंवा MoRTH वेबसाइटवर होणार आहे.