
देशभरातील 1 लाख 46 हजार 145 किलोमीटरच्या कुठल्याही रस्त्यावर आणि त्यावरील 1 हजार 63 टोलनाक्यांवर आता तुम्हाला वर्षभरात केवळ 3 हजारात सुस्साट प्रवास करता येणारेय. होय.. तुम्ही जे ऐकलंय. ते अगदी खरंय.. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी सर्व वाहनचालकांसाठी एक मोठी खुशखबर दिलीये. त्यांनी नेमकं काय म्हटलंय. पाहूया..
15 ऑगस्ट पासून फास्टटॅगची ही वर्षिक पास योजना सुरु होणारेय. या नव्या योजनेमुळे वाहनचालकांची जवळ जवळ 7 ते 10 हजारांची बचत होणार असून प्रतिटोल केवळ 15 रुपये इतकाच टोल वाहनचालकांसाठी लागणारेय. मात्र यासाठी नेमक्या अटी आणि शर्ती काय आहेत पाहुया..
फास्टटॅग योजना फक्त खासगी वाहनांसाठी
व्यावसायिक वाहनांना ही योजना लागू नाही
फास्ट टॅग खातं सक्रीय असणं गरजेचं
वर्षभरात 200 टोलवरुन प्रवासाची मुभा
देशभरातील महामार्गावर वाढत जाणाऱ्या टोलचे दर पाहता वर्षभरासाठी केवळ ३ हजारांमध्ये टोलची ही नवी योजना मास्टरस्ट्रोक मानला जातोय. यामुळे राष्ट्रीय महामार्गावरची प्रवास क्षमता वाढवण्यास आणि टोल नाक्यांवरील रांगा नक्कीच कमी होईल पण या 3 हजारांच्या टोल सोबत रस्तेसुध्दा खड्डेमुक्त मिळावेत हीच इच्छा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.