FASTag New Rules: नवीन FASTag नियम लागू, 'या' चूका करणाऱ्यांना टोलदारीत भरावा लागेल मोठा दंड

FASTag Rules: नवीन फास्टॅग नियम 17 फेब्रुवारी म्हणजेच आजपासून लागू होणार आहेत. या नियमांनुसार, टोल रीडरमधून वाहन गेल्यानंतर 15 मिनिटांपेक्षा जास्त वेळ व्यवहार झाला, तर वापरकर्त्यांना अतिरिक्त शुल्क भरण्याची शक्यता आहे.
FASTag New Rules
FASTag New RulesYandex
Published On

सोमवार 17 फेब्रुवारीपासून फास्टॅगसाठी नवीन नियम लागू होणार आहेत. या अंतर्गत, जे वापरकर्ते फास्टॅगमध्ये कमी बॅलन्स, पेमेंट विलंब किंवा ब्लॅकलिस्टमध्ये असतील, त्यांना अतिरिक्त दंड लागू होईल. सरकारचा हेतू आहे की, फास्टॅगच्या समस्यांमुळे टोल प्लाझावर वाहनांच्या लांब रांगा कमी होवो आणि प्रवास अधिक सोयीस्कर व्हावा. या नियमामुळे फास्टॅग वापरणाऱ्यांना तत्काळ पेमेंटची आवश्यकता आणि सिस्टममध्ये सुधारणा करण्यास मदत होईल.

नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) आणि रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने FASTag प्रणालीमध्ये महत्त्वाचे बदल जाहीर केले आहेत. ज्याचा उद्देश टोल पेमेंट प्रक्रिया सुलभ करणे, वाद कमी करणे आणि फसवणूक रोखणे आहे. नवीन फास्टॅग नियम १७ फेब्रुवारी म्हणजेच आजपासून लागू होणार आहेत. या नियमांनुसार, जर FASTag टोल प्लाझावर पोहोचण्यापूर्वी ६० मिनिटांपेक्षा जास्त काळ आणि टोल ओलांडल्यानंतर किमान १० मिनिटे फास्टॅग निष्क्रिय राहिला, तर त्याचा व्यवहार नाकारला जाईल.

FASTag New Rules
Crime News: महाड येथे तीन तलाकविरोधात पहिला गुन्हा दाखल, पतीसह सासरच्यांवर पोलिसांची कारवाई

टोल पेमेंट सुलभ करण्यासाठी आणि वाद कमी करण्यासाठी चार्जबॅक प्रक्रिया, कूलिंग कालावधी आणि व्यवहार नाकारण्याच्या नियमांमध्ये सुधारणा केली आहे. नवीन नियमांनुसार, जर वाहन टोल रीडरमधून गेल्यानंतर १५ मिनिटांपेक्षा जास्त वेळ टोल व्यवहार झाला, तर फास्टॅग यूजर्सना अतिरिक्त शुल्क भरणे आवश्यक होईल.

FASTag New Rules
Indian Railways: कौतुकास्पद! रेल्वेत चढताना घसरला पाय, जवानाच्या प्रसंगावधानाने प्रवाशाचा वाचला जीव

नॅशनल इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन (NETC) यांच्या मते, फास्टॅग खात्यात कमी बॅलन्स असल्यास आणि व्यवहारात विलंब झाल्यास टोल ऑपरेटर जबाबदार असेल. यापूर्वी वापरकर्ते टोल बूथवरच फास्टॅग रिचार्ज करू शकत होते, पण नवीन नियमानुसार, वापरकर्त्यांना आधी फास्टॅग रिचार्ज करणे आवश्यक आहे

FASTag New Rules
FasTag: फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, सर्व वाहनांसाठी फास्ट-टॅग अनिवार्य

महत्वाचे मुद्दे:

शिल्लक ठेवा: टोल प्लाझावर पोहोचण्यापूर्वी, तुमच्या FASTag मध्ये पुरेसा रिचार्ज शिल्लक आहे याची खात्री करा, अन्यथा समस्या निर्माण होऊ शकतात.

केवायसी अपडेट करा: ब्लॅकलिस्टिंग टाळण्यासाठी तुमचे फास्टॅग केवायसी तपशील नियमितपणे अपडेट करा आणि खात्याची स्थिती तपासत राहा.

स्थिती तपासा: लांब प्रवासाला निघण्यापूर्वी तुमच्या FASTag ची स्थिती तपासून त्यात आवश्यक असलेली शिल्लक आणि अपडेट्स सुनिश्चित करा.

नवीन FASTag नियमांचा उद्देश नागरिकांसाठी टोल व्यवहार सुलभ आणि विश्वासार्ह बनवणे आहे, जे अधिक सुरक्षित अनुभव प्रदान करतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com