देशात मोठ्या दहशतवादी कारवायाचा पर्दाफाश झाला आहे. गुजरातनंतर हरियाणामधूनही धक्कादायक माहिती समोर आली आहे. गुजरातमध्ये एरंडीच्या बियांपासून विष तयार करत देशात मोठा कट रचला होता. पण गुजरात एटीएसने तीन जणांना ताब्यात घेत मोठा डाव उधळला होता. हे प्रकरण ताजे असतानाच हरियाणामधून त्यापेक्षा मोठं प्रकरण समोर आलेय. जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी फरिदाबादमधील एका डॉक्टरच्या घरावर छापा टाकला. यामध्ये तब्बल ३०० किलो आरडीएक्स, एक एके-४७ आणि मोठ्या प्रमाणात दारूगोळा जप्त केला. (Major Terror Plot Foiled! 300 Kg RDX, AK-47 Seized from Doctor’s House in Faridabad)
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी काही दिवसांपूर्वी फरीदाबाद जिल्ह्यात छापा टाकला होता. छाप्यादरम्यान, मुजाहिल शकील असे एका काश्मिरी डॉक्टरला ताब्यात घेण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी, डॉक्टरच्या माहितीवरून, जम्मू पोलिसांनी ३०० किलो आरडीएक्स, एक एके-४७ रायफल, ८४ काडतुसे आणि पाच लिटर रसायने जप्त केली. जप्त केलेल्या एकूण वस्तूंची संख्या ४८ असल्याचा अंदाज आहे. देशात मोठा दहशतवादी कट उधळला गेला असून पोलिस चौकशी सुरू आहे.
डॉ. मुजाहिल शकील याच्या घरातून मिळालेल्या सामनाचा तपास गुप्तचर यंत्रणाचे पथक करत आहे. छापेमारीनंतर जम्मू काश्मीर पोलिसांनी स्थानिक पोलिसांसोबत संपर्क केला. या प्रकरणाबाबत हरियाणा पोलिसांकडून अद्याप कोणतीही माहिती देण्यात अलेली नाही. रविवारी सकाळी शकील याच्या घरासमोर १० ते १२ गाड्या उभारल्या होत्या. डॉ. शकील त्यावेळी पोलिसांच्या ताब्यातच होता. त्या डॉक्टरांच्या समोरच त्याच्या घरातून १४ बॅग जप्त करण्यात आल्या. या बॅग खूप वजनदार असल्याचे सांगण्यात येतेय.
तीन महिन्याआधी आरोपी डॉक्टराने घर भाड्याने घेतले होते. घरात फक्त माझेच सामान राहील, असे त्याने घरमालकालाही सांगितले होते. दरम्यान, डीसीपी एनआयटी मकसूद अहमद, धौज पोलिस स्टेशनचे एसएचओ आणि पोलिस प्रवक्ते यांनी या कारवाईचे अथवा अटकेचे वृत्त नाकारले आहे. पोलिस आयुक्त सतेंद्र गुप्ता यांनीही मीडियाशी बोलण्यास नकार दिला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.